1. बातम्या

ढगाळ वातावरणामुळे या तिन्ही पिकांना आहे धोका, कराव्या लागतील या उपाययोजना

वातावरणामध्ये झालेला बदल याचा परिणाम पिकांवर होतो. यावेळी तर १५ दिवसापासून वातावरणात बदल झालेला आहे. अशी स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने लावलेला आहे. मराठवाडा मध्ये अवकाळी पावसाचा अंदाज लावला असून मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. या वातावरणात रब्बी च्या पेरण्या सुखरूप आहेत मात्र खरीप मधील तूर, कापूस आणि नव्याने लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला या वातावरनाचा धोका आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
onion

onion

वातावरणामध्ये झालेला बदल याचा परिणाम पिकांवर होतो. यावेळी तर १५ दिवसापासून वातावरणात बदल झालेला आहे. अशी स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने लावलेला आहे. मराठवाडा मध्ये अवकाळी पावसाचा अंदाज लावला असून मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. या वातावरणात रब्बी च्या पेरण्या सुखरूप आहेत मात्र खरीप मधील तूर, कापूस आणि नव्याने लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला या वातावरनाचा धोका आहे.

कांद्यावर करपा रोगाचा  प्रादुर्भाव:

फुलोरा मध्ये लावलेल्या तुरी ला मारुका तर कापसाला बोंडअळी चा धोका निर्माण झाला आहे. जर काढणीच्या दरम्यान या पिकांना किडीपासून वाचवले तरच शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन पडेल. ढगाळ वातावरणामुळे कांद्याची वाढ होत नाही.कापूस पिकावर बोंड अळी, तुरीवर मरुका तर कांद्यावर करपा रोगाचा  प्रादुर्भाव दिवसेंदिवस  वाढतच  निघाला आहे. ही ३  पिके उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.

कांद्यावर फवारणी गरजेची:-

ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर जास्त परिणाम होतो. कांदा लागवड करून थोडाच कालावधी लोटलेला आहे तोपर्यंत या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पडताच जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगावर मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली तुम्ही १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. ही फवारणी तुम्ही त्वरित केली पाहिजे असा सल्ला कृषी विभागाणे दिलेला आहे.तुरीच्या पिकावर मारुका कीड दिसल्यास फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली ही १० लिटर पाण्यात मिसळावे आणि मिश्रण करावे त्यामुळे या किडीवर तुम्ही प्रादुर्भाव भेटवू शकता.


कापसाला गुलाबी बोंडअळीचा धोका:

अंतिम टप्यात असणारे कापसाच्या पिकावर आता ढगाळ वातावरणामुळे बोंड अळीचा धोका वाढला आहे त्यामुळे कापूस उत्पादक वर्गाने "बीटी" ची फवारणी करणे खूप  गरजेचे  आहे त्यामुळे कापसाचे सरंक्षण होईल नाहीतर शेतकऱ्यांच्या पदरात अपयश येईल.

English Summary: These three crops are in danger due to cloudy weather, these measures have to be taken Published on: 13 November 2021, 01:44 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters