1. बातम्या

कृषी क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणाऱ्यांना 'या' चार व्यक्तींना मिळाला पद्मश्री पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर सोमवारी संध्याकाळी पद्म पुरस्कार 2021 काही लोकांना सन्मानित करण्यात आले. कोणत्याही विशिष्ट क्षेत्रांमध्ये आपली विशेष सेवा देणाऱ्या व्यक्तींना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना  पद्मश्री पुरस्कार

कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर सोमवारी संध्याकाळी पद्म पुरस्कार 2021 काही लोकांना सन्मानित करण्यात आले. कोणत्याही विशिष्ट क्षेत्रांमध्ये आपली विशेष सेवा देणाऱ्या व्यक्तींना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.

यावर्षी जवळजवळ 102 लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 102 लोकांमधून चार व्यक्ती असे आहेत त्यांच्या कृषी क्षेत्रामध्ये विशेष योगदान आहे. त्या व्यक्तींबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 चंद्रशेखर सिंह

नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा क्षेत्रामधून आलेले कृषी वैज्ञानिक चंद्रशेखर सिंह यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांना या अगोदर केंद्र आणि राज्य सरकारचे बरेच सन्मान मिळाले आहेत. चंद्रशेखर यांना उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे आणि शेतकऱ्यांना विशेष प्रकारचे शिक्षण देणे या कार्यासाठी हा सन्मान दिला गेला. चंद्रशेखर सीए शेतकऱ्यांसाठी डिजिटल पोर्टल हे चालवतात. जे कृषी शाईन डॉट कॉम या नावाने प्रसिद्ध आहे.

  पप्पा मल( जैविक महिला शेतकरी)

 तमिळनाडू राज्याच्या महिला शेतकरी पप्पा मल यांचे वय जवळ-जवळ एकशे पाच वर्षे आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दक्षिण मध्ये त्यांना लेजेडरी वुमन या नावाने ओळखले जाते. पप्पा मला यांना हा पुरस्कार जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जैविक उत्पादन निर्माण करण्यासाठी दिला गेला. त्या आपल्या अडीच एकर शेतामध्ये फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन कुठलेही रसायन न वापरता घेतात.

 

 नानाद्रो बी मारक( मिरची उत्पादक शेतकरी)

  नानाद्रो हे मेघालय राज्यातील पश्चिम गारो हिल्स येथे राहणारे शेतकरी आहेत. ते मुख्यत्वे काळी मिरचीचे उत्पादन घेतात. काही दिवसांअगोदर त्यांनी ३३०० मिरचीचे रोपांची लागवड केली होती. त्यांचे वय ६१ वर्षापेक्षा जास्त आहे. परंतु अजूनही येथे काळी मिरचीची शेती करून तिचे उत्पादन घेतात.  २०१९ मध्ये त्यांनी जवळ-जवळ ८ लाख रुपयांचे काळी मिरचीचे उत्पादन घेतले होते.

 प्रेमचंद शर्मा( डाळिंब उत्पादक)

 शेती आणि फळ बागायतदार या क्षेत्रामध्ये रामचंद्र शर्मा यांचे नाव उत्तराखंड राज्यात सन्मानाने घेतले जाते. त्यांना डाळिंब शेतीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डाळिंब पिकामध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळेल या बाबतीत त्यांचे कार्य आहे. वर्ष २००० मध्ये त्यांनी डाळिंबाच्या प्रगत दीड लाख जातींची रोपांचे नर्सरी तयार केली होती. 

डाळिंब शेतीचे बारकावे शिकवण्यासाठी प्रेमचंद हे बऱ्याच वेळा हिमाचलमधील कुल्लू, जळगाव सोबतच महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये सुद्धा जाऊन आले आहेत.

English Summary: These four persons received Padma Shri awards for their special contribution in the field of agriculture Published on: 30 January 2021, 12:26 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters