1. बातम्या

राहिला नाही तालमेळ, असा झाला राजनीतीचा खेळ !

गेल्या दोन-तीन दिवसाच्या अगोदर वृत्तपत्र वाचताना शेतकरी नेत्यावरील आरोप वाचल्या गेले ,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
राहिला नाही तालमेळ, असा झाला राजनीतीचा खेळ !

राहिला नाही तालमेळ, असा झाला राजनीतीचा खेळ !

गेल्या दोन-तीन दिवसाच्या अगोदर वृत्तपत्र वाचताना शेतकरी नेत्यावरील आरोप वाचल्या गेले , शेतकऱ्यांचे नाव वापरून राजकीय क्षेत्रात दलाली व आंदोलनात, निवडणुकीत, सौदेबाजीसाठी हे अपक्ष आमदार नौटंकी करतात, आता हे लोकांना माहीत होऊन त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे . शेतकरी, शेतमजुराच्या कष्टाची शासन तिजोरी लुटायची आणि पडद्या आडून कोटीच्या व अब्जोच्या घरात भ्रष्टाचारी मार्गाने , संपत्ती जमा करायची, ही गोष्ट प्रत्येकाच्या मनाला भेडसावणारी व मतदाराला खिन्न वाटणारी आहे. आज फक्त शासनाची तीजोरी लुटण्याचे ध्येयच फक्त राज्यकर्त्यांच्या समोर आहे. 

गेल्या 40 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस राबराब राबून कर्जमुक्तीअसो, For the last 40 years, farmers have been fighting day and night for debt relief. विद्युत बिलअसो, वन्यप्राणी संरक्षण कायदा असो , गोवंश हत्या बंदी कायदाअसो, कापसाची राज्य बंदी असो, फेडरेशनची कापसा वरील तीन टक्के कपातअसो, किंवा शासनाला विविध निवेदने देण्याचे काम असो.... इत्यादी शेतकऱ्यांच्या संकटावर मात करण्यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रात्रंदिवस काबाडकष्ट करतात, कीत्येकांचे आंदोलन करता करता तर आयुष्य बरबाद झाली आहे. गेली 40 वर्षे पासून शासनाच्या विरोधात आवाज उठविणे ही साधी बाद नाही. गेल्या 40 वर्ष हा या राजकीय भूतांच्या

खेळात टिकला हे खरे आता शेतकऱ्यांचे भाग्य आहे? जनतेने ही बाब अतिशय लक्षात ठेवावी. आर्थिक स्वातंत्र्य मिळवीण्यासाठी राज्यकर्त्यांचा आधार घेऊन, शेतकरी क्रांतीअजिबात होऊ शकत नाही ? तर त्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधातच उभे राहावे लागते. या सत्ताधीशांच्या विरोधातच उभे ठाकावे लागेल आणि आजचे आमदार, खासदार हे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधी लढा देण्यासाठी तयार नाहीत ?तर मग शेतकरी हिताचे कायदे करण्याचा हा गुंता कसा सुटेल ? आणि ते फक्त काम आतापर्यंत शेतकरी संघटनेनेच केले आहे.

शेतकऱ्याच्या नावावर जे काही पक्ष आहेत ते सरकार दरबारी घुसून मलाई चाटण्याकरिता शेतकरी पक्ष उभे करतात.आणि जे नेते शासनाचा आधार घेऊन शेतकरी उठाव करायला निघालेत ते जनतेची फसवणूक करत आहेत, यात तीळ मात्र शंका नाही. आताचा तरुण कार्यकर्ता शासनाची तिजोरी लुटण्यासाठि फक्त शासनात जाण्यासाठी धावपळ करीत आहे. गेल्या 40 वर्षाच्या घडामोडीनुसार शेतकरी बिल्लाधारी कार्यकर्त्यांची मुलं बाळ मोठी झाली, कुटुंबातील लहान मुले लग्नाला आली, शिक्षणाला आली आणि घराचा प्रपंचाचा बोझा त्यांच्या डोक्यावर सतत वाढत गेला . तरीपण

छातीवर बिल्ला लावून तो शेतकरी व शेतमजुरांसाठी आजच्या या भस्मासुर सत्ताधीशांच्या विरोधात लढतच राहिला. आणि हेच राजकीय पक्षांचे लोक शासनाचे तिजोरी खाऊन मालगुजार झाले व संघटनेच्या कार्यकर्त्यांची आपापल्या गावात खिल्ली उडवायला लागले. लढता लढता काहींचे तर प्राण गेले, आणि काहींच्या परिस्थित्या मरणासन्न अशा व्यवस्थेत आल्यात, आणि हे बोगस नेते शेतकऱ्याचे नाव घेऊन वेगवेगळ्या नावाने शेतकरी संघटना स्थापन करतात व सत्तेची मलाई चाखून शेतकऱ्यांच्या ढुंगणावर लाता मारतात, आणि वरून आम्हीच शेतकऱ्यांचे कैवारी जनतेला दाखवतात. हे सर्व

विदूषक आता उघडे पडले आहे. शेतकऱ्याच्या नावावर जर अशी दुकानदारी वाढत असेल, तर आता शरद जोशीचे हजारो लेकरे व त्यांची शेतकरी संघटना यांना झोडपल्या शिवाय सुद्धा राहणार नाही. गावा गावात फिरू सुध्दा देणार नाही ? आज शेतकरी संघटनेचे हजारो लोकांचे मेळावे महाराष्ट्रात होत आहे, निश्चितच एक दिवस शेतकरी क्रांती पुन्हा उभी झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या घरातील परिस्थिती इतकी विदारक व सामान्य असून सुद्धा तो हतबल झाला नाही. तरी तो शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शेतकरी

संघटनेचा बिल्ला , छातीवर लावून अजूनही शेतकरी हितासाठी धावत आहे. त्यासाठी कुठलाही शासनाचा तो आधार घेत नाही. कारण खरे शेतकऱ्यांचे दुःख हे त्यालाच कळले आहे.                                महाविदूषकांनी व काही भारतातील शेतकरी नेत्यांनी राजकारणाची फक्त दुकानदारी वाढविली आहे. शरद जोशी म्हणायचे कर, कर्जा, नही देंगे, बिजली का बिल भी नही देंगे. याचाच अर्थ असा की- शेतकरी शेतमजुराने जर टॅक्सेशन भरले नाही तर शासनाच्या तिजोरीत पैसा जमा होणार नाही. आणि शासन तिजोरीत जर पैसा जमा झाला नाही तर या सत्ताधीशांची, राज्यकर्त्यांची जळफळात झाल्याशिवाय राहणार

नाही ते कर्मचाऱ्यावर बोखळू न जनतेवर केसेस दाखल करायला लावतील, शहरी विकासाची कामे थांबतील. तेव्हाच शेतकऱ्यांची किंमत सत्ताधाऱ्यांना कळेल. पण हा कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपाचा आहे. एकट्या, दुकत्याचा नाही. त्यात सर्व जनतेने सहभाग घेणे गरजेचे आहे तेव्हाच ती क्रांती होऊ शकेल ? हे काम फक्त तुम्हाला दोन ते तीन वर्षे करावे लागेल परंतु यातून शेतकऱ्याच्या संपूर्ण आयुष्याची व्यवस्था च मोकळी होइल.घराचे टॅक्सेशन,शेतावरील वायदा भरला नाही तर वीतंडवाद वाढतील. सत्ताधीशांना पैसा नाही तर सरकार कसे चालवावे ही परिस्थिती

तयार होईल. सत्ताधीशांना व राज्यकर्त्यांना पैसा खायला मिळाला नाही तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी हिताचे कायदे झाल्याशिवाय, आम्ही एक पैसा सरकारला देणार नाही ही वृत्ती ठेवावी लागेल . तरच शासनाला घाम फुटेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व शरद जोशी सुद्धा म्हणायचे काँग्रेस ही शेतकऱ्यांची शत्रू नंबर एक आहे, परंतु ग्रामीण भागातील लोकांनी या महान नेत्यांचे व संतांचे ऐकले नाही. जर ग्रामीण भागातील लोकांनी ऐकले असते तर आज ही वेळ शेतकऱ्यावर

आली नसती. परंतु सामान्य परिस्थितीचा समाज गावातल्या भोपाल्याच्या ताब्यात गेला.आणि महात्म्यांच्या विचारांना मूठ माती दिली.सन 1986 मध्ये शरद जोशी म्हणायचे शेतकऱ्याने जर माझे ऐकले नाही तर एक दिवस निसर्ग ऐकणार आहे. नैसर्गिक संकटामुळे या सत्ताधीशांना, शेतकऱ्यांना तुटपुंजी आर्थिक मदत करणे जड जाईल. आणि चौतकर भाकरीचा तुकडा फेकून जे आतापर्यंत शेतकरी खेळवल्या जात होते तो सर्व प्रकार उघड होईल. आणि हे ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या देशातील

पुन्हा क्रांती उभी झाल्याशिवाय राहणार नाही? सुलतानशाहीच्या व्यवस्थेत तर शेतकरी भरडल्या जात आहे, परंतु नैसर्गिक संकटात जर सापडला तर तो खऱ्या अर्थाने शेतकरी आंदोलनात उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण पोटाची भूक हिच क्रांती घडवीत असते. ती परिस्थिती आज येऊन ठेपलेली दिसत आहे. आणि आजही काँग्रेसच्याच धोरणावर, पावलावर पाऊल बीजेपी सरकार सुद्धा टाकीत आहे. त्यामुळे गेल्या 75 वर्षात शेतकत्यासाठी आर्थिक समृद्धीच्या ठोस धोरणा मध्ये काही ही बदल झाले नाही.

 

आपला नम्र-

धनंजय पाटील काकडे

मो.न. ९८९०३६८०५८.

कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना समन्वय समिती. महाराष्ट्र

मु.- वडूरा, पोस्ट- शिराळा, तालुका- चांदूरबाजार, जिल्हा- अमरावती.

English Summary: There is no coordination, this is the game of politics! Published on: 22 October 2022, 08:53 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters