शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच आर्थिकदृष्टया प्रबळ व्हावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमी कोणत्या न कोणत्या योजना राबवत आहे. सरकार फक्त शेती व्यवसायलाच नाही तर त्यासोबत शेतीला असणारे जोडव्यवसाय जे आहेत त्यास सुद्धा सरकार पाठबळ देत आहे. शेतकऱ्यांचा विकास व्हावा होच सरकारची इच्छा आहे आणि त्यासाठी सरकार नेहमी कोणत्या न कोणत्या उपाय योजना राबवून तसेच अनुदान आणून शेतकऱ्यांना मदत करत आहे.
केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन :-
किसान क्रेडिट कार्ड ही योजना या अनुषंगानेच चालू केली आहे. पशुपालन व्यवस्थापन करण्यासाठी १-३ लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे जे की या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर १५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख आहे. पशूसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय आणि वित्तियसेवा विभाग यांच्या माध्यमातून १५ नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारी च्या दरम्यानच किसान क्रेडिट कार्ड ही मोहीम राबिवली आहे त्यामुळे या योजनेत जास्तीत जास्त पशुपालकांनी सहभाग घ्यावा असे केंद्र सरकारचे मत आहे.
विनातारण 1 ते 3 लाखापर्यंतचे कर्ज :-
या योजनेचा एक उद्देश आहे की पशुपालकांना सुद्धा किसान क्रेडिट कार्ड पाहिजे. किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून पशुपालक धारकांना १ लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे. मात्र जर तो शेतकरी सहकारी दूध सोसायटी, दूधसंघ, दूध उत्पादक कंपनी यासोबत संलग्न असेल तर त्यास ३ लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे आणि ते सुद्धा विनातारण कर्ज मिळणार आहे मात्र त्या शेतकऱ्यास परतफेड ची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ही योजना फक्त पशु खरेदी साठी नाही तर पशूंचे व्यवस्थापन करण्यासाठी आहे.
योजनेची माहिती अन् अंतिम मुदत :-
किसान क्रेडिट कार्ड ही योजना पशुपालन व्यवसाय अधिक वाढवावा या उद्देशाने काढली आहे. ही योजना पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत राबिवली गेली आहे ज्यामुळे पशुधारकांना या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे. १५ फेब्रुवारी ही या योजनेची शेवटची तारीख आहे. या योजनेबद्धल जर जास्त माहिती हवी असेल तर तुम्हास पशूपालकांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी वर्गाशी संपर्क साधावा लागणार आहे.
Share your comments