1. बातम्या

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा एकदा चुकला,गाढवाचा धोका,कोल्हा तारणार का

KJ Maharashtra
KJ Maharashtra
weather

weather

हवामान खाते हे पावसाचा अंदाज व्यक्त करत असते. यावर्षी सुद्धा हवामान खात्याने जून महिन्यात सर्वाधिक पाऊस पडेल असा अचूक अंदाज वर्तवला होता. त्यामुळं शेतकरी वर्गाने बिनदास्त झाला होता.

बदलत्या हवामानामुळे अंदाज ठरला फेल :

प्रत्येक वर्षी हवामान खात्याचा अंदाज हा पोकळ पनाचा ठरत  आहे  त्यामुळं  महाराष्ट्र  राज्यातील शेतकरी हा चांगलाच  अडचणीत सापडला आहे. पावसाच्या अंदाजवर शेतकऱ्याला पेरणी करणं चांगलाच अडचणी सापडला आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्याच्या सुरवातीला जोरदार आणि भरपुर मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडला. शेतकरी वर्गाने  पावसानंतर पेरण्या  सुद्धा योग्य पध्दतीने केल्या. परंतु पेरण्या करताच पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळं शेतकरी खूप चिंतेत आहे.

महागाईच्या काळात शेतकरी वर्गाने मूग, घेवडा, सोयाबीन, उडीद, बाजरी ही महागडी बियाणी पेरली आहेत  त्यामुळं न  पडणाऱ्या पावसामुळं यांचे मोठे नुकसान होईल त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे.आपल्याकडे मृग नक्षत्र मध्ये पावसाला सुरवात होते. यंदा च्या साली मृग नक्षत्र मध्ये पाऊस ही उत्तम आणि जोरदार पडला. गाढवाच्या नक्षत्रात पडलेला पाऊस कोल्ह्याच्या नावाच्या नक्षत्राप्रमाणे पडत नसल्याचा अंदाज शेतकरी वर्गाला येत आहे.

प्रत्येक वर्षी हवामान खाते पावसाचा अंदाज व्यक्त करतात. आणि शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या की हवामानाचा अंदाज व्यक्त होणेच बंद होऊन जाते. बऱ्याच वेळा हवामानाचा अंदाज हा चुकीचा ठरलेला आहे. याचा जोरदार  फटका शेतकरी वर्गाला  बसला  आहे.या हवामानाच्या अंदाजामुळे शेतकर्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. या हवामानाच्या पोकळ अंदाजामुळे दुबार पेरणीची भीती ही शेतकरी वर्गाला लागली आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters