भूर्गभात सतत हालचाली सुरु असतात. या हालचालींचा प्रत्यय हा नेहमी येत असतो. अहमदनगर (Ahmednagar) जिह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोरबन गावाजवळील सराटी परिसरात जमिनीला अचानक भेगा पडल्या आहेत. तेथील बोअरवेलचे पाणीही गायब झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या भागात नेहमी भूर्गभातील हालचाली सतत अनुभवायला मिळतात. या भागात बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. संगमनेर तालुक्यातील बोरबन, सराटी परिसरात टेकडवाडी वस्तीवर बुधवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.
एका बाजूला डोंगर व दुसरीकडे नदीपात्र काही अंतरावर आहे. अशा ठिकाणी असलेल्या टेकडवाडी वस्तीजवळ या भेगा आढळून आल्या आहेत. बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर यांनी प्रशासनाला याची माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
ऊसाचा राडा काय संपेना; हंगामाच्या अंतिम टप्प्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटणार
तलाठी दादा शेख व कर्मचारी शशिकांत खोंड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबाबत तज्ज्ञांमार्फत तपासणी सुरू असून ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी केले आहे.
Share your comments