1. बातम्या

पावसा बाबत चे व्हायरल सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हायरल पोस्ट फिरत आहे ती म्हणजे चार महिने मान्सुन पुढे सरकला आहे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पावसा बाबत चे व्हायरल सत्य

पावसा बाबत चे व्हायरल सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हायरल पोस्ट फिरत आहे ती म्हणजे चार महिने मान्सुन पुढे सरकला आहे आणि ऑक्टोबर पासून मान्सुन पाऊस चालू होणार आहे आणि ती पोस्ट आहे सटाणा जिल्हा नाशिक या कॉलेज मध्ये प्राध्यापक असलेले किरण कुमार जोहरे ह्या व्यक्ती ची मुळात हा व्यक्ती हवामान शास्रज्ञ नाही हे आधी सांगतो हे कधी तरी IMD मध्ये कामाला असलेले जोहारे सध्या शिक्षक आहेत.

आता संतापजनक प्रकार असा की हे जोहारे साहेब 2 वर्षे पासून शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत Now the outrageous situation is that this Johare Saheb has stood up to the farmers for 2 years अतिशय बेजबाबदार असे वक्तव्य हे करताना दिसत आहे.

हे ही वाचा - देऊळगाव माळी महसूल मंडळात ढगफुटी; पावसाने उडवली दाना दान, हजारो हेक्टर वरील पिकांची नासाडी.

त्यात ते कशाचा आधार घेतात हे माहीत नाही मुद्दा 1 त्यानी यंदा सांगितले होते की 15 ऑगस्ट रोजी नाशिक मध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये मान्सुन येईल पण झाले उलटे 15 ऑगस्ट पर्यन्त नाशिक मधील 70% धरणे भरली होती.

मुद्दा 2 सूर्या वर वादळे होत आहे सौर वादळे आणि त्याचा परिणाम पृथ्वी च्या चुंबकीय शक्ती मॅग्नेटिक force वर होऊन जुलैमध्ये पाऊस पडला खरे तर हे सर्व हशयस्पद आहे. वरील जोहरे यांच्या पोस्ट मुळे शेतकरी वर्ग मध्ये चलबिचल झाली आहे मी त्याना ओपन आवाहन करतो*की असे काही असेन तर सिद्ध करा नाहीतर समस्त शेतकरी वर्गाची माफी मांगा

काहीतरी स्टेटमेंट देऊन मोकळे व्हायचे एकतर शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात सगळीकडून शेतकरी आर्थिक संकटात आहे आणि शेतमालाला बाजार भाव नाही दुसरे द्राक्ष बागा छाटणी जवळ आली आहे काही लोकांनी छाटण्या केल्या तर पेस्ट करता येईना आणि त्यात हे महाशय असे बोलता

 

दिपक जाधव 9422322138

जोपुळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक

English Summary: The viral truth about rain Published on: 19 September 2022, 09:08 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters