सध्या ऊस गाळप हंगाम सुरू होत असून अनेक कारखान्यांनी आपली धुराडी पेटवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कारखान्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील पळसे सहकारी साखर कारखान्याचा (Sugar Cane) गाळप हंगाम शुभारंभ केला.
यावेळी मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, साखर कारखाना हे मंदिर, या मंदिरातला देव हा शेतकरी आहे. कामगार पुजारी आहे, संचालक मंडळ सेवेकरी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच खऱ्या अर्थाने असा जर आपण कारखाना चालवला तर हा पहिला कारखाना नाही, तुमचे धडाधड एक दोन तीन चार दहा वीस कारखाने होतील, असेही ते म्हणाले. तसेच सरकार चांगल काम करणाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
भोंग्याचा आवाज झाला आणि सभासदांनी जल्लोष केला! अखेर भीमा पाटस सुरू होणार
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या महिन्यातच आम्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गाळप हंगामाबाबत बैठक घेतली. यामध्ये आपण महिनाभर 15 ऑक्टोबर पासून गाळात सुरू करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला.
तसेच शेतकऱ्यांना जवळपास 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी दिली गेली. राज्याने देशात सर्वाधिक 98 टक्के एफआरपी दिली गेली, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
'त्या' कारखान्यांना ऊस तोडणेसाठी अडथळा आणू नये, राजू शेट्टी यांचे कार्यकर्त्यांना आदेश
तसेच इथेनॉल जो आहे 5 टक्केवरून दहा टक्के, दहा टक्क्यावर वीस टक्के भविष्यामध्ये वाहन देखील पूर्ण इथेनॉलवरच चालतील. त्यामुळे हा जो काही इथेनॉलचे उत्पादक आहे. हे आपल्या साखर कारखान्याला मदतीचा देखील सहकार्य ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो तुम्ही असे का नाही करत? हा पठ्ठया विकतोय 100 रुपये किलोने ऊस, आता शेतकऱ्यांनाच व्यापारी व्हावे लागेल..
देशी बटाटे विदेशींना पसंत, निर्यात 4.6 पटीने वाढली! आता बटाट्यापासून शेतकऱ्यांना चांगले दिवस..
शेतकऱ्यांच्या गाई दूध दरात 3 आणि म्हैस दरात 2 रुपयांची वाढ
Share your comments