1. बातम्या

मानलं रे भावा…! विद्यार्थ्याने शेतकऱ्यांसाठी बनवलं अनोखं अँप; फिचर्स जाणून तुम्हीही म्हणाल व्वा क्या बात हैं….!

भारत एक शेतीप्रधान देश आहे, देशातील अर्थव्यवस्था शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक कंपन्या तसेच शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावत असतात. सुधारित बियाणांची निर्मिती सुधारित खतांची निर्मिती देशात मोठ्या प्रमाणात होत असते जेणेकरून शेतकरी बांधवांना अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य होईल.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
golden crop app image credit lokmat

golden crop app image credit lokmat

भारत एक शेतीप्रधान देश आहे, देशातील अर्थव्यवस्था शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक कंपन्या तसेच शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावत असतात. सुधारित बियाणांची निर्मिती सुधारित खतांची निर्मिती देशात मोठ्या प्रमाणात होत असते जेणेकरून शेतकरी बांधवांना अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य होईल.

अनेकदा शेतकरी बांधवांना चुकीच्या पिकांची लागवड केल्यामुळे, चुकीची बियाणे पेरल्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागतो. यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडतो. शेतकऱ्यांच्या यां समस्या जाणून एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने एक भन्नाट अँप्लिकेशन तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेत जमिनीचा पोत ओळखून, शेत जमिनीचा प्रकार तसेच आजूबाजूच्या हवामानाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांना योग्य त्या पिकाची लागवड करण्यास मदत होणार आहे. एकंदरीत यामुळे शेतकरी बांधवांना पीक निवड करता येणे शक्य होणार आहे.

अरविंद या विद्यार्थ्यांने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हे ॲप्लिकेशन निशुल्क सेवा देणार आहे, यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार. यां अप्लिकेशन मध्ये सध्या स्थितीला कृषी व्यवस्थापन हा पर्याय खुला झाला आहे आणि भविष्यात माती परीक्षण आणि पीक निवड हे फीचर्स देखील वापरता येणे शक्य होणार आहे.

कोणतं आहे अँप्लिकेशन - अरविंद याने या अँप्लिकेशनला गोल्डन क्रोप असं नाव दिले आहे. हे एप्लीकेशन शेतकरी बांधवांना पीकवाढी संदर्भात महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना पुरवणार आहे या व्यतिरिक्त ये बहुउपयोगी अप्लिकेशन शेतकऱ्यांना पीक निवडण्यात मदत करणार असून यामुळे शेतकरी बांधवांना जमिनीचा प्रकार देखील जाणून घेता येणार आहे. हे ॲप्लिकेशन शेत जमिनीचा प्रकार ओळखून व आजूबाजूच्या हवामानाचा विचार करून योग्य पीक लागवडीचा सल्ला देणार आहे.

विशेष म्हणजे अरविंद ने तयार केलेलं अ‍ॅप पीक केव्हा काढणीला येईल अर्थात किती दिवसात पीक उत्पादन देईल, शेतमालाचा चालू बाजारभाव याविषयी देखील शेतकऱ्यांना अवगत करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजारात सध्या मिळत असलेले दर एका क्लिकवर बघता येणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून मातीची चाचणी देखील करता येणे शक्‍य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

माती परीक्षण करण्यासाठी एप्लीकेशन स्थानिक माती परीक्षण प्रयोगशाळेशी जोडले जात असते यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना माती परीक्षण करण्यासाठी आटापिटा करण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे शेतक-यांना जमिनीचा प्रकार ओळखून तसेच जमिनीमध्ये असलेले पोषक घटक ओळखून योग्य पीक लागवड करता येणार आहे.

एवढेच नाही सदर ॲप्लिकेशन मध्ये असलेले युअर क्रॉप या फिचरचा वापर करून शेतकरी त्यांच्या पिकांचा मागोवा देखील घेऊ शकणार आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. हे ॲप्लिकेशन लवकरच वेगवेगळ्या भाषेत लॉन्च केलं जाणार आहे. तसेच यामध्ये अजून सुधारणा केल्या जाणार असून या ॲप्लिकेशनला शेतकऱ्यांच्या हितासाठी अजूनच अद्ययावत केले जात आहे.

English Summary: The student made a unique amp for farmers; Knowing the features, you too will say wow what a thing.! Published on: 05 April 2022, 12:30 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters