cold wind from the north
सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट महाराष्ट्राकडे झेपावल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, निफाडमध्ये राज्याचे हंगामातील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १०) उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट तर मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेले काही दिवस असलेले धुके आणि ढगाळ वातावरण दूर झाले असून, उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत आहे. परिणामी उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट आली आहे. सोमवारी (ता. ९) अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांवर घसरला. तर कोकण वगळता जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान १३ अंशांच्या खाली होते.
एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रावतांमुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट कमी-अधिक होत आहे. सोमवारी (ता. ९) मध्य प्रदेशातील नवगाव येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.आज (ता. १०) महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, उत्तर कर्नाटक या राज्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
नेहेमी पैस देऊन जाणारे पीक म्हणजे अननस! अननसाची लागवड तंत्र जाणून घ्या..
तसेच उत्तर भारतासह ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यात कितीही थंडी पडली तर मुंबईत मात्र दरवर्षीचं फारशी थंडी नसते. तरी हा वर्षीच्या हिवाळ्याने मात्र गेल्या कित्येक वर्षातील तापामानाचे आकडे मोडत यावर्षी राज्याची राजधानी मुंबईने देखील थंडीचे सगळेचं रेकॉर्डस ब्रेक केले आहे.
... तर शेतकरी आत्महत्या करणार नाही! बळीराजा आहे सर्वांचे भविष्य...
तरी या आठवड्यात मुंबई शहरासह उपनरात कडाक्याची थंडी पडणार असल्याची शक्यता हावामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे थंडी कधी कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
'मातीची सुपिकता हा विषय आज चिंतन करण्यासारखा'
महावितरण गरीब शेतकऱ्यांच्याच मागे, गरीब शेतकऱ्यांना रीडिंग न घेता हजारोंमध्ये वीज बिल
काही महिन्यापूर्वीच तयार केलेला राज्य मार्ग ट्रॅक्टरने नांगरला, मी बीडीओ, मुलगा वकील असल्याची दिली धमकी
Share your comments