1. कृषीपीडिया

'मातीची सुपिकता हा विषय आज चिंतन करण्यासारखा'

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
soil cheaking farm

soil cheaking farm

नमस्कार मंडळी वाचाल तर वाचाल, आपन सर्वांना माहीत असेल की शेतकऱ्यांची उत्पादनाबाबत परिस्थिती खुप हालाकिची आहे. दोन तीन वर्षापासून काही भागात सोयाबीन व तुर कमी होत आहे, त्यावरचे व्हायरस कंट्रोल होतच नाहीत. कितीही भारी किटकनाशके, माॅलिक्युल मारा काही फरकच पडत नाही. आपल्या भागातून मुग, उळीदचा विषयच संपलाच मुख हे पिक रोगामुळे जात असते तर कुठल्यातरी औषधाने ठिक झालेच असते, मुळ समस्या पिकाची नाही मातीची आहे. 

मातीचा कस सेंद्रिय कर्ब कमी झाला. बरं साधारणपणे किती कमी झाला असेल थोड़ी माहीती पाहुयात सुपिक जमिनीचा सेंद्रिय कर्ब २% घ्या आसपास असतो, कृषी विद्यापीठ यांच्या माहीतीनुसार तर वाळवंटात तो ०.५ % म्हणजे अर्धा टक्का असतो तर मग आपल्या जमिनीचा कर्ब कमीतकमी यापेक्षा जास्तच असायला हवा ना पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, कि एरीगेशन मधे जमिनीचा सरासरी सेंद्रिय कर्ब ०.३ % म्हणजे वाळवंटापेक्षा दुप्पटीने निकस जमीन आणि आजचा शेतकरी पिकवण्याची कसरत करत आहे.

भरघोस उत्पादनाची आस लावून बसलाय परिणामी कुपोषित गायच्या पोटी अशक्त व अपंग वासरूच जन्माला येईल, तशी परिस्थिती आपल्या मातीची आहे. त्याप्रमाने कोणतेही पिक लावा, रोग त्याच्या पाचविला पुजलेला असतो. रोग कमी यावे व अनुकूल वातावरण मिळावे, याकरिता शेतकरी हायटेक टेक्नॉलॉजी वापरतात, मल्चिंग करतात, शेडनेट, पाँलिहाऊस करतात माझे ह्या हाईटेक शेतीला दुमत नाही पण होते काय ? शेतकऱ्यांचे कर्जदेखील फिटत नाही.

रंगीबेरंगी फुलकोबीच्या लागवडीत नफाच नफा, बदलणार शेतकऱ्यांचे नशीब!

मग शेतकऱ्यांचे हाल विचारायलाच नकोत, एक वर्ष पिक चांगले येते, मग पुढचे काही वर्ष त्याचे झालेले पैसे पुन्हा त्यातच खर्च करायचे व पुन्हा पहिल्यासारखे उत्पन्न निघण्याची वाट पहायची, हे दुष्ट चक्र चालूच रहाते. हेच उदाहरण घ्या विदर्भात सोयाबीनचे निरुपयोगी, बेभरवशाचे पिक आपण करु लागलो. चार-पाच वर्षांपर्यत केवळ पेरले की पावसाच्या पाण्यावर काहीही न करता येत होते.

पण आजची परिस्थिती पहा, सोयाबिनला भारीच्या भारी किटकनाशके मारायची वेळ आली. कुठे चाललाय शेतकऱ्यांचा खर्च कशी परवडणार शेती? मला असे वाटते की, विचार करा समस्या नीट समजून घेणे गरजेचे आहे. मुख्य उपाय मातीच्या व पिकाच्या पोषणावर करणे गरजेचे आहे, मग दुय्यम उपाय रोगांसाठी करायला हवे.

पण होते ते उलटेच. पावसाळी वातावरणात किंवा प्रतिकूल वातावरणात पिकांचे पोषण अत्यल्प होते किंवा थांबते. “पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते .परिणामी प्रतिकारशक्ती कमी होते, पिकं पिवळी पडून विविध रोगांना बळी पडतात. शेतकरी किडी व रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी खूप खर्च करताना दिसतात.

प्रक्रिया उद्योगांमध्ये मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर; भविष्यात मका लागवड ठरेल फायदेशीर

ह्या समस्येची तिव्रता अन्नद्रव्यांची कमतरतामुळे वाढत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. किडी व रोगावर औषधे मारण्याबरोबर पिकांची अन्नद्रव्यांची गरज भागवणे त्याहून महत्त्वपूर्ण आहे. अन्यथा शेतकरी किडी व रोगावर औषधे मारत राहतो. यामुळे पिक कमजोर पडत जाते. हे असे होते कि आपण आपला रोग तर बरा करतोच आहे, पण सलाईनच बंद पडले, मग पूर्णपणे शरीरावर अशक्तपणा जाणवतो.

एक दिवस पिक कायमचे सोडून द्यावे लागते. अगदी १०/१५ वर्षांपूर्वी तर एवढे रोग नव्हते, मुग उळीद इत्यादी पिके कोणतीही विशेष काळजी न घेता आजच्यापेक्षा छान पिकायच असे काय होते जमिनीत त्यावेळी जे आज नाही ? हे मान्य करावे लागेल व चिंतन करण्यासारखा गंभीर प्रश्न आहे. जमिनीचा कस म्हणजे सेंद्रिय कर्ब होय.
मिलिंदजी गोदे
सेंद्रिय शेती अभ्यासक
milindgode111@gmail.com

महत्वाच्या बातम्या;
महावितरण गरीब शेतकऱ्यांच्याच मागे, गरीब शेतकऱ्यांना रीडिंग न घेता हजारोंमध्ये वीज बिल
काही महिन्यापूर्वीच तयार केलेला राज्य मार्ग ट्रॅक्टरने नांगरला, मी बीडीओ, मुलगा वकील असल्याची दिली धमकी
... तर शेतकरी आत्महत्या करणार नाही! बळीराजा आहे सर्वांचे भविष्य...

English Summary: Soil fertility is a topic worth pondering today Published on: 10 January 2023, 10:24 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters