PM Kisan लाभार्थ्यांच्या खात्यात आला सहावा हप्ता ; असे तपासा आपले खाते

19 August 2020 10:10 AM By: भरत भास्कर जाधव


प्रधानमंत्री  किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकले जात आहेत.  पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये टाकले जात असून वर्षाला सरकारकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑगस्ट रोडी साडेआठ कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात डिजिटल माध्यमातून सहावा हप्ता हस्तांतरित करण्यात येत आहे. 

दरम्यान आपल्या खात्यात पैसे आले नसतील तर या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या खात्याविषयी माहिती घेऊ शकतात.

(https://pmkisan.gov.in)

  • पेज ओपन झाल्यानंतर पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर 'Farmers Corner' च टॅब दिसेल.  या पर्यायामध्ये असलेल्या 'Beneficiary Status' वर ॉ क्लिक करा.
  • 'Beneficiary Status'मध्ये आपला आधार नंबर टाका किंवा अकाऊंट नंबर किंवा आपला नोंदणी झालेला मोबाईल नंबर टाका.
  • जर आपण आधार नंबर टाकला असेल तर इतर ठिकाणीही आधार नंबर टाका. आणि त्यानंतर  'Get Data' वर क्लिक करा.
  • जर खाते क्रमांक टाकला असेल तर इतर ठिकाणीही  खाते क्रमांक टाका, आणि 'Get Data' वर क्लिक करा. अशीच प्रक्रिया मोबाईल नंबरबरोबर करा. त्यानंतर आपल्या समोर सर्व हप्त्यांची माहिती प्रदर्शित होईल.

आपल्याला पीएम किसानच्या पोर्टलवर आपले बँक खाते क्रमांकाचे शेवटचे आकडे दिसतील. आणि  खात्यात आलेल्या पैशांची माहिती म्हणजेच कधी पैसे खात्यात आले याची माहिती आणि युटीआर नंबर दिसेल. जर पोर्टलवरती आपल्या खात्यात पैसे आल्याचे दिसत असेल पण बँकेकडून मेसेज आला नसेल तर आपण बँकेत याविषयीची चौकशी करावी.


pm kisan fake beneficiaries PM Kisan PM-KISAN pradhanmantri kisan samman nidhi प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम-किसान पीएम किसान योजना पीएम किसान योजना लाभार्थी
English Summary: The sixth installment came to the account of PM Kisan beneficiaries

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.