पीएम किसानबाबत मोठी अपडेट समोर, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा महत्वपूर्ण निर्णय
१. सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी
पीएम किसानबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी केंद्रशासित प्रदेशांना पीएम-किसानसह सर्व केंद्रीय कार्यक्रम पूर्णपणे लागू करण्यास सांगितले आहेत.जेणेकरून शेतकऱ्यांना सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकेल.
सरकारी निवेदनात म्हटले आहे की, तोमर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या उद्देशाने केंद्रशासित प्रदेशांसोबत राष्ट्रीय राजधानीत बैठक झाली. केंद्रशासित प्रदेशांमध्येही या योजनांची 100% अंमलबजावणी सुनिश्चित केली जावी, जेणेकरून तेथील सर्व शेतकऱ्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. असं वक्तव्य कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे.
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं
२. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन अधिकच वाढलं आहे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केलीये.
यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मात्र आता नुकसानग्रस्तांना कधी मदत मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; राजू शेट्टी यांची मागणी
३. अवकाळीने शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल केलं आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अक्षरशः शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात गेलीये. नांदेड जिल्ह्यालाही अवकाळीचा चांगलाच तडाखा बसला आहे. अवकाळीमुळं केळी, टरबूज, भाजीपाला या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय.
आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील नांदेड परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलीये. सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केलीये.
'कृषी उत्पन्न बाजार समिती' चा जल्लोष साजरा करून झाला असेल तर कृपया मंत्री,आमदार, खासदार, यांनी नुकसानग्रस्तांना मदत करावी'
४. कापसाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी धडपड करत आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला तर काहींचा कांदा हा तसाच शेतात पडून आहे. असं असताना शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका काही संपायचं नाव घेत नाही.
दररोज नवीन संकटाला राज्यातील शेतकरी समोर जातोय. आता उमेश पाटील यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावर काही मन हेलावून टाकणारी दृश्ये शेयर केली आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती चा जल्लोष साजरा करून झाला असेल तर कृपया मंत्री आमदार खासदार पालकमंत्री यानी राजकारण न करता नुकसानग्रस्त भागात भेट देऊन त्वरित जिथं गरज त्यांना मदत करावी. अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं बरंच नुकसान
५. यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं बरंच नुकसान झालं आहे. अरविंद पद्माकर थोरात यांनी देखील त्यांच्या परिसरातील काही दृश्य शेयर केली आहेत. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आणि यात मात्र नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचीच वाट लागली आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केलीये.
शेतकऱ्यांनी मेहनतीच्या जोरावर पिकवलेल्या उभ्या पिकाची आज या गारपिठीने राखरांगोळी केलीय. त्यामुळे या गारपिठीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सरकारने आणि प्रशासनाने एसीच्या बाहेर निघुन तातडीने करावेत अन् बघा जमल तर मदत करायला कारण ज्याला तुम्ही निवडणुकीपुरते जगाचा पोशिंदा शेतकरीराजा म्हणता तो आता अडचणीत सापडलाय असा टोलाही त्यांनी लगावलाय.
अधिक बातम्या :
महत्त्वाची बातमी! पीएम किसानवर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
1 मे पासून हे चार मोठे बदल होत आहेत, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार, वाचा सविस्तर...
महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी! LPG सिलेंडर झाला स्वस्त; जाणून घ्या दर किती कमी झाले?
Share your comments