शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्यातिल मुळ प्रश्नाला जाणीवपूर्वक बाजूला ठेवून केंद्र आणी राज्य सरकार एक मेकांचे उणे दुणे काढत आहे. या निर्लज्ज सरकारला आलेल अपयश लपविण्यासाठी जणतेच्या भावनेशी खेळत असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वानखेड येथे पार पडलेल्या बळीराजा हुकांर यात्रेच्या जाहीर सभेत बोलतांना सरकारवर केला. शेतकऱ्यांचा हुंकार फोडण्यासाठी राजु शेट्टी यांनी १६ एप्रिल पासून राज्यभरात चालु केलेली बळीराजा हुकांर यात्रा दि.२९ रोजी शेगाव संग्रामपूर तालुक्यात पोहचताच शेतकऱ्यांनी यात्रेला प्रचंड प्रतिसाद देत रुधाणा,चिचारी,व वानखेड येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात राजु शेट्टी यांनी बोलताना जाती धर्मात अडकलेल्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी
शेतकऱ्यांनी एकत्रीत येऊन सरकारशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा असे भावनिक आवाहन करीत शेतकऱ्यांच्या लढण्याच्या सर्व वाटा मोकळ्या करून दिल्या. भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील पातुर्डा येथील विहरीचे दर्शन घेऊन यात्रेची सुरुवात केली. १० वाजता रुधाना येथे ढोल ताशाच्या गजरात गावात मिरवणूक काढून राजु शेट्टी यांचे औक्षण करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले चौकात शेतकऱ्यांच्या लक्षणीय उपस्थितीत सभा पार पडली.
दुपारी २ वाजता सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल चिचारी येथे शेकडो एकर जमिनीचा घोटाळा उघडकीस होऊन तरी कारवाई का होत नाही असा सवाल करीत आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्या यासाठी आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन करत राजु शेट्टी यांनी आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आणी जमीनी परत मिळवून देण्यासाठी व जमीनी हडपणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलतांना सांगितले. संध्याकाळी ७ वाजता वानखेड येथिल समारोप सभेतून केंद्र आणी राज्य सरकारवर हल्ला चढवत खरपूस समाचार घेतला. डिझेल पेट्रोल चे गगणाला भिडलेले भाव रासायनिक खते औषधीने भावाचा उचांक गाठला आहे.
शेती मालाचे भाव मात्र जाणीवपूर्वक पाडल्या जातात हे शेतकरी विरोधी सरकारचे छडयंत्र हाणुन पाडा. मंदिर मस्जिद वरचे भोंगे उतरवायचे कि नाही त्याही पेक्षा शेतकऱ्यांचे झाडाला लटकलेली प्रेतं उतरायचा सरकारने विचार करावा. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करावी असा खोचक सल्ला या वेळी जाहीर सभेत बोलतांना राजु शेट्टी यांनी सरकारला लगावला. या वेळी स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर,पुजाताई मोरे,गजानन पाटील बंगाळे यांनी भाषणातुन चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी अंनता मानकर, उज्वल पाटील चोपडे, उज्वल पाटील खराटे, विजु ठाकरे,प्रविण पोपटनारे, गोपाल तायडे यांच्या सह हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Share your comments