1. बातम्या

मॉन्सून दुसरा टप्पा राहणार दमदार ; १०४ टक्के पावसाचा अंदाज

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


जूनमध्ये दमदार बरणार वरुण राजा जुलैमध्ये काही नाराज झाल्यासारखा दिसला. जुलै महिन्यात पुर्ण देशात १० टक्के कमी पाऊस झाला आहे. गेल्या पाच वर्षांत हा जुलै महिना सर्वाधिक कोरडा राहिला. उत्तर- पश्चिम आणि मध्य भारतातील बऱ्याच भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. दरम्यान भारतीय हवामान विज्ञान विभागाने आपला अंदाज बदलला असून सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे.

हवामानाच्या विभागाच्या मते, मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये १०४ टक्के पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.  या अंदाजात ८ टक्क्यांची कमी - अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  त्यानंतर शुक्रवारी हवामान विभागाने मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे.  यानुसार देशात यंदाच्या मॉन्सून हंगामात १०४ टक्के पाऊस पडणार असून ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाचा अंदाज आहे.

प्रिन्सीपल कांपम्पोनंट रिग्रेसन व मॉन्सून मिशन कपल्ड फॉरकास्टिंग सिस्टीमनुसार हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधरण पाऊस मानला जातो.  सर्वसाधारणपणे मॉन्सून एकून हंगामातील पावसापैकी ४९ टक्के पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पडतो. १९६१ ते २०१० या कालावधीत दीर्घकालीन सरासरीनुसार या दोन महिन्यात देशात ४२८.३ सेमी पाऊस होतो.

यावेळी मॉन्सून मध्ये डेफिसिटमध्येही नाही आणि सरप्लसमध्ये नाही. जूनमध्ये १८ सरप्लस पाऊस झाला तर जुलै महिन्यात १० टक्के डेफिसिट पाऊस झाला. प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीचे तापमान आणि वातावरणीय स्थिती ही एल निनो थंड मात्र सर्वसामान्य स्थितीत असल्याचे संकेत देत आहेत. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेलनुसार मॉन्सून प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान आणखी थंड होणार आहे. मात्र मॉन्सून हंगामात एल निनो सामान्य स्थितीच राहणार आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters