नाशिक जिल्ह्यातील मुख्य बाजार पेठेत सर्वच ठिकाणी कामकाज सुरू होऊन आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात लगभग 900 रूपयांपर्यंत घसरण झाल्याचे बघायला मिळाले. तरी सलग दुस-या दिवसापासून आवक घटल्याने कांद्याच्या भावात थोडीशी सुधारणा झाली.जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज दिवाळीच्या सणानंतर सुरू झाले आहे. तरी उत्पादकांकडे साठवलेल्या कांद्याची उपलब्धता कमी झाली आहे. तर प्रतवारीत घटली आहे. या कारणाने उन्हाळ कांद्यापेक्षा बाजार पेठेत नवीन येणारा कांदा भाव खात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पिपंळगाव बाजार पेठ समितीत तिपटीने आवक वाढली आहे. तर लासलगाव बाजार समितीत दुपटीने आवक वाढली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी कांद्याचा लिलाव उशिरापर्यंत सुरू होतो. तर लासलगाव मध्ये सोमवारी ( ता.23) 1502 वाहनांची आवक झाली. तर मंगळवारी ( ता.24) तारखेला कमी होऊन 758 वाहनांची आवक झाली आहे. दिवाळीच्या सणानंतर सुरू झालेल्या बाजारात पॅनिक सेल होऊन उच्चांकी आवक झाल्याने जिल्ह्यात कांद्याच्या दरात फटका बसला. हे शेतक-यांच्या लक्षात घेता आवक कमी केल्याने दरात पुन्हा सुधारणा झाली.
हेही वाचा :भारतात बऱ्याच शहरांमध्ये बटाटा 70 रुपये पर्यंत पोहोचला आहे, कांदा 100 आणि टोमॅटो शतकाच्या जवळ
सोमवारी सटाणा बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. परिणामी काही वाहने कांद्यासह परत न्यावी लागली. त्यानंतर दुस-याच दिवशी दरात घसरण झाल्याने शेतक-यांनी कांदा विक्रीत नियोजन करून आवक कमी झाली. व मनमाड बाजार समितीत मंगळवारी आवक वाढल्याचे दिसून आले.
Share your comments