1. बातम्या

रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा काढताय; मग जाणून विम्याविषयीच्या महत्त्वाच्या तारखा

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकांचे कधीही नुकसान होऊ शकते. पीक विमा योजना विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. नासाडी झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई साठी शासन आपल्याला शेती क्षेत्रानुसार काही रक्कम ठरवून देते थोडक्यात आपण त्याला पीक विमा सुद्धा म्हणतो.पंतप्रधान पीक विमा योजना ही आपल्या देशात 2016 या सालासुन आमलात आणली गेली आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकांचे कधीही नुकसान होऊ शकते. पीक विमा योजना विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. नासाडी झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई साठी शासन आपल्याला शेती क्षेत्रानुसार काही रक्कम ठरवून देते थोडक्यात आपण त्याला पीक विमा सुद्धा म्हणतो.पंतप्रधान पीक विमा योजना ही आपल्या देशात 2016 या सालासुन आमलात आणली गेली आहे.

योजनेची उद्दिष्टे

  • नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.

  • शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि सुधारित शेती तंत्र आणि साहित्य वापरण्यास प्रोत्साहित करणे.

  • पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखणे.

  • कृषी क्षेत्राला कर्ज देण्यामध्ये सातत्य राखणे.

पिकांसाठी योजना

रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकरी सहभागी होऊ शकतात.

शेतकऱ्यांचा सहभाग

अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी (कुळ किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या शेतकऱ्यांसह) या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. पीक कर्जदार आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल.

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत

  • रब्बी ज्वारी ३० नोव्हेंबर २०२१
  • गहू, हरभरा, कांदा 15 डिसेंबर 2021
  • उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग – 31 मार्च 2022
  • सर्व पिकांसाठी जोखीम पातळी 70% आहे.

उंबरठा उत्पादन

अधिसूचित क्षेत्रामध्ये, अधिसूचित पिकाच्या उत्पादनाचा उंबरठा मागील 7 वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या गुणाकाराने पिकाची जोखीम पातळी विचारात घेऊन निर्धारित केला जातो.

हेही वाचा : शेतकऱ्यांचा शेतमाल हवाई मार्गाने पोहचणार बाजारपेठेत; सरकारने लॉन्च केली Krishi Udan Scheme

विमा संरक्षणाच्या बाबी

पेरणीपासून काढणीपर्यंत पीक उत्पादनात घट प्रतिकूल हवामान, पूर, पाऊस, दुष्काळ इत्यादींमुळे शेतकऱ्यांचे अपेक्षित उत्पादन उंबरठ्यावरील उत्पादनाच्या 50 टक्क्यांहून अधिक घटणे अपेक्षित असल्यास विमा संरक्षण देय आहे.काढणीनंतरची गारपीट, चक्रीवादळ, अवकाळी पावसामुळे कापणी/कापणीनंतर 14 दिवसांत सुकण्यासाठी शेतात पसरलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान होते. स्थानिक नैसर्गिक आपत्तींनी व्यापलेल्या क्षेत्राला पूर आल्यास, भूस्खलन आणि गारपिटीसारख्या स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीच्या बाबतीत अधिसूचित पिकाचे नुकसान वैयक्तिक पंचनामा करून निश्चित केले जाते. (युद्ध आणि आण्विक युद्धाचे परिणाम, हेतुपुरस्सर नुकसान आणि इतर टाळता येण्याजोगे धोके विम्यामध्ये समाविष्ट नाहीत.)

विमा भरपाईचे आश्वासन

रबी – 2021-22 च्या उन्हाळी हंगामात महसूल मंडळ/तालुक्यातील सरासरी उत्पन्न उंबरठ्यावरील उत्पन्नापेक्षा कमी असल्यास, खालील सूत्रानुसार भरपाईची रक्कम वजा केली जाते.

नुकसान भरपाई रु. = उंबरठा उत्पादन प्रत्यक्ष-आलेले सरासरी उत्पादन / उंबरठा उत्पादन × विमा संरक्षित रक्कम रू.

 

नुकसान भरपाई मिळवण्यासाठी

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अचानक नुकसान झाल्यास संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक, पीक विमा अॅपवर ७२ तासांच्या आत माहिती द्यावी. याद्वारे संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाचे सरासरी उत्पन्न उंबरठ्याच्या खाली गेल्यास, वरील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यानुसार रक्कम जमा केली जाते.

विमा योजनेत सहभागी होण्यासाठी

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीही या विमा योजनेत सहभाग अनिवार्य नाही. मात्र, शेतकऱ्याने विमा योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम तारखेच्या किमान ७ दिवस आधी संबंधित बँकेला लेखी कळवणे आवश्यक आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांचा ७/१२ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीची स्वयंघोषणा घेऊन अधिकृत बँकेकडे विमा अर्ज सादर करून प्रीमियम भरावा. त्याने भरलेल्या हप्त्याची पावती जवळ ठेवावी.

याशिवाय, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) सरकारच्या मदतीने तुम्ही विमा योजना मिळवू शकता. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृपया संबंधित कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

English Summary: The rabbi takes out insurance for the crops of the season, then knowing the important dates of insurance Published on: 29 October 2021, 03:39 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters