शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 वा हफ्ता जमा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मार्फत पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. कृषी मंत्रालयाने 11व्या हफ्त्याबाबत कालच माहिती दिली होती. त्याप्रमाणे आज शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 वा हफ्ता जमा झालेला आहे. एका वर्षात लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट जमा केली जाते.
11 व्या हफ्त्याची मागील काही महिन्यांपासूनच बरीच चर्चा सुरु होती. या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'चा 21,000 कोटी रुपयांचा 11 वा हप्ता पोहचला आहे. अखेर 10 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आज 2000-2000 रुपये पोहोचले.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसानचा 21,000 कोटी रुपयांचा 11 वा हप्ता DBT द्वारे 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली.
पंतप्रधान मोदी शिमला, हिमाचल प्रदेश येथे या योजनेचा 11वा हप्ता जारी केला. त्यावेळी ते म्हणाले आज मला सिमल्याच्या भूमीतून देशातील 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याचा बहुमान मिळाला आहे.भारतीय अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाचे महत्व अधिक आहे. नाही म्हटलं तरी जवळजवळ ६० ते ७०% लोक ही शेती आणि शेतीच्या निगडित व्यवसायांशी संबंधित असतात.
त्यामुळे केंद्र सरकारने ही योजना राबविली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आत्म निर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य हेतू होय. प्रति वर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये म्हणजेचच प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये त्याचे वितरण करते. आणि ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यातच जमा केली जाते.
पीक कर्जाबाबत ठाकरे सरकारची मोठी घोषणा; बँकांना दिले 'हे' आदेश
जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर,
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक : 011-23381092
पीएम किसान नवीन हेल्पलाइन क्रमांक : 011-24300606
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पीएम किसानची अजून एक हेल्पलाइन क्रमांक आहे: 0120-6025109 तसेच
ई-मेल आयडी: [email protected] यांच्याशी संपर्क साधावा.
महत्वाच्या बातम्या:
UPSC Result : नादच खुळा: साताऱ्याच्या शेतकरी पुत्राची यूपीएससी परीक्षेत उत्तुंग भरारी
कृषी केंद्रांवर कृषी विभागाची करडी नजर; आता 9 भरारी पथक करणार 'हे' काम
Share your comments