गेल्या अनेक वर्षांपासून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना (Pomegranate Growers) निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या उन्हाचा देखील मोठा फटका बसत आहे. वाढत्या उन्हामुळे डाळिंबाच्या बागा (Pomegranate Orchard) संकटात सापडल्या असून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा (Pomegranate Farmer) काळजाचा ठोका चुकत आहे.
मात्र वाढत्या उन्हापासून डाळिंबाची बागा संरक्षित करण्यासाठी आणि वाढलेल्या उन्हाचा उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून हिंगोली जिल्ह्यातील एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने असं काही जुगाड केला आहे की आता या शेतकऱ्यांची संपूर्ण राज्यात चर्चा होऊ लागली आहे.
तालुक्यातील मौजे माळसेलु येथील राजू पाटील या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने वाढत्या उन्हापासून आपली डाळिंबाची बाग सुरक्षित करण्यासाठी आपल्या दोन एकर डाळिंबाच्या सहाशे झाडांवरील फळांना क्रॉप कव्हरने आच्छादन घातलं आहे. यामुळे वाढत्या उन्हापासून डाळिंबाचे फळ वाचवण्यास मदत होत आहे.
Farming Business Idea: या फळाला आहे मोठी मागणी; लागवड करा आणि कमवा वार्षिक 10 लाख
गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असल्याने राजू यांच्या डाळिंब बागाला देखील याचा विपरीत परिणाम सहन करावा लागत होता. यामुळे राजू पाटील यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.
10 हजाराचा जुगाड सोन्यासारखे पीक वाचविण्यासाठी सक्षम
सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून उष्णतेचा प्रकोप बघायला मिळत आहे. या वाढत्या उष्णतेचा फळबागांना मोठा फटका बसत असून डाळिंबाच्या बागा देखील यामुळे होरपळून निघत आहेत. यामुळे राजू यांची डाळींब बाग धोक्यात आली आहे.
मात्र, राजू पाटील यांनी आयडियाची भन्नाट कल्पना लावत चक्क डाळींब पिकांना क्रॉप कव्हरवचे अच्छादन केले आहे. विशेष म्हणजे या जुगाडासाठी त्यांना केवळ दहा हजार रुपये खर्च आला आहे. म्हणजेच कमी खर्चात सोन्यासारखं डाळींब पीक वाचणार आहे.
Share your comments