भारताने अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मोठी प्रगती केली आहे. शेतीसह शेतीशी निगडीत देखील क्रांती केली आहे. तसेच पशुपालन करताना भारताचे नाव हे अग्रस्थानी घेतले जाते. मेरठमध्ये सध्या किसान मेळा सुरू आहे. या किसान मेळ्यात दहा कोटींची म्हैस आकर्षणाचे केंद्र राहिली आहे.
यामुळे याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या म्हशीचे नाव गोलू असून तिचे वजन हे 1500 किलो आहे. गोलूसोबत सेल्फी काढायला लोक प्रचंड गर्दी करत होते. यामुळे तिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मेरठमधील सरदार वल्लभ भाई पटेल कृषी विद्यापीठात किसान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात हरयाणातील पानिपतमधून दहा कोटी रुपयांची म्हैसही मेरठमध्ये आली आहे. यामुळे या मेळ्यात फक्त गोलूचीच चर्चा सुरू आहे.
'त्या' कारखान्यांना ऊस तोडणेसाठी अडथळा आणू नये, राजू शेट्टी यांचे कार्यकर्त्यांना आदेश
या म्हशीच्या खानपान आणि संगोपनासाठी महिन्याला लाखो रुपये खर्च येतो. या म्हशीची किंमत दहा कोटींपर्यंत असल्याचे म्हशीचे मालक नरेंद्र सिंह सांगतात. ही म्हैस दररोज 25 लिटर दूध, 15 किलो फळे, 15 किलो धान्य आणि दहा किलो मटार खाते.
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! शेतातील विजेच्या तार आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटना वाढल्या...
या म्हशीचे शुक्राणू विकून म्हशीचे मालक महिन्याला लाखो रुपये कमवतात. यामुळे या म्हशीची किंमत वाढत आहे. गोलूला रोज सहा किमी चालण्यासाठी नेले जाते. गोलूच्या शरीराची रोज तेलाने मालिश केली जाते. यामुळे याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो तुम्ही असे का नाही करत? हा पठ्ठया विकतोय 100 रुपये किलोने ऊस, आता शेतकऱ्यांनाच व्यापारी व्हावे लागेल..
देशी बटाटे विदेशींना पसंत, निर्यात 4.6 पटीने वाढली! आता बटाट्यापासून शेतकऱ्यांना चांगले दिवस..
शेतकऱ्यांच्या गाई दूध दरात 3 आणि म्हैस दरात 2 रुपयांची वाढ
Share your comments