1. पशुसंवर्धन

म्हैस उलटण्याची काय आहेत कारणे, जाणून घ्या लक्षणे

KJ Staff
KJ Staff


आज काल शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे वळला आहे. पशुपालन यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. परंतु पशुपालन करीत असताना जनावरांना होणारे व्याधी, जनावरांच्या गर्भधारणे संबंधी आजार यामुळे पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक फटका बसू शकतो. कारण पशुपालन व्यवसाय मधील आर्थिक गणित हे दूध उत्पादनावर अवलंबून असते. व प्रजनन संबंधी काही विकार जनावरांना असले तर त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होत असतो. त्याच्यामुळे जनावरांचे व्यवस्थापन करताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. या लेखात आपण म्हैस उलटण्याच्या कारण बाबत माहिती घेऊ. यामध्ये प्रामुख्याने गाय किंवा म्हैस उलटण्याची अनेक कारणे असतात. त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे जनावरांचा माज व्यवस्थित ओळखता न येणे किंवा बऱ्याचदा जनावरांच्या माजाची दखल पशुपालकांना द्वारे घेतली जात नाही. यामुळे माजाच्या योग्य वेळेत नैसर्गिक, कृत्रिम रेतन करता येत नाही. त्यामुळे पशुपालनाचे आर्थिक नुकसान होऊ शकते.  यानंतर माजावर आलेल्या गाई म्हशी बिनचूक ओळखता न येणे,  बाळाचे लक्षणाविषयी माहिती नसणे, किंवा माजावरील जनावरांकडे दुर्लक्ष करणे इत्यादी कारणांमुळे जनावरे वेळेवर भरली जात नाही. त्यामुळे जनावरे वारंवार उलटतात. त्यामुळे पशुपालकांनी या सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष ठेवणे गरजेचे असते.

                माजाची लक्षणे

माजाची लक्षणे ही जनावरे स्पष्ट माजावर येण्यापूर्वीची लक्षणे, जनावरातील स्पष्ट पक्का माजाची लक्षणे आणि जनावरातील पक्का माज संपल्यानंतरची लक्षणे या तीन प्रकारात मोडतात. तेव्हा जनावरात स्पष्ट माज येतो त्याअगोदर जनावरे कळपातील इतर जनावरांवर उड्या मारतात. दुसऱ्या जनावरांबरोबर लगट करण्याचा प्रयत्न करतात. गाय किंवा म्हैस अधूनमधून हंबरते,  गाय किंवा म्हैस अस्वस्थता किंवा बेचैन होते.  त्यांची भूक मंदावते, दूध देण्याच्या प्रमाणात घट होते, अशी जनावरे गोठ्यामध्ये सतत फिरत असतात.  योनीचा भाग किंचित ओलसर व लालसर आणि सुजल्यासारखा दिसतो. परंतु याला अपवाद म्हणजे कधी कधी म्हशींमध्ये वरील माजाची लक्षणे दिसत नाहीत. कधी-कधी मुका माज दाखविण्याचे प्रमाण अधिक असते.

दुसऱ्या प्रकारचे माजाची लक्षणे म्हणजे गाय किंवा म्हैस कळपातील वळू कडे आकर्षित होऊन जवळ जाऊन उभी राहते. दुसरी जनावरे पाठीमागून उड्या मारत असल्यास माजावर आलेली जनावरे स्थिर उभी राहतात, तेव्हा ओळखावे की जनावरांमध्ये पक्का माज आलेला आहे.  माजावर आलेली जनावरे शक्ती उंचावून वारंवार लघवी करतात.  योनीमार्गातून पारदर्शक काचेसारखा स्वच्छ चिकट स्राव तारेसारखा बाहेर लोंबकळू लागतो.  तो जनावराच्या शेपटीवर तसेच मागील भागावर चिकटलेल्या परिस्थिती आढळून येतो. जनावरांमध्ये अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्यांना कृत्रिम,  नैसर्गिक रेतन करण्याचा योग्य कालावधी समजावा. स्पष्ट, पक्का माज संपल्यानंतर दोन-तीन दिवसांनी बहुतांश गाईंच्या योनीमार्गातून थोड्या प्रमाणात रक्तस्राव बाहेर पडताना दिसतो.

माज संपल्यानंतर गाईच्या शरीरात इस्ट्रोजनचे प्रमाण कमी होते आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण वाढत जाते. गर्भाशयाच्या आतील आवरणात असलेल्या ग्रंथीवर या संप्रेरकाचा प्रभाव होऊन त्या ग्रंथीमधून रक्तस्राव होतो. नैसर्गिक बाब असते. वरील साधारणपणे लक्षणे दिसल्यास जनावरांना माज झाला आहे की नाही हे पटकन ओळखता येते. अशावेळेस आपण जर वेळेवर नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन करून जनावरांमध्ये उलटण्याची प्रमाण कमी होऊ शकते.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters