ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीमध्ये होणाऱ्या उष्णतेपासून सगळ्यांचे कायमची सुटका होण्याची दाट चिन्हे आहेत. वातावरणामध्ये गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या सततच्या बदलामुळे गेल्या काही वर्षात पावसाचा मुक्काम हा वाढताना दिसत आहे. हवामान तज्ञांनी व्यक्त केलेल्या नव्या अंदाजानुसार ऑक्टोबर हिट यापुढे जाणवणारच नसल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.मोसमी वाऱ्यांचा देशातील विविध भागांमध्ये होणारा प्रवेश आणि त्याचा माघारी फिरण्याचा नवा अंदाजीत कालावधी आणि तारखा हवामान विभागाने जाहीर केल्या त्यातून सत्यता समोर आली.
गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मोसमी पावसाच्या झालेला बदल लक्षात घेता हवामान विभागाने मोसमी वाऱ्यांच्या देशातील प्रवासाच्या अंदाजीत नव्या वेळा नुकत्याच जाहीर केल्या होत्या. यात वेळा जाहीर करण्यासाठी जवळ-जवळ गेल्या ५० वर्षातील मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाचा अभ्यास करण्यात आला. पावसाचा नेहमीच असलेल्या जून ते सप्टेंबर हा कालावधी संपल्यानंतरही ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पाऊस सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राची स्थिती पाहिल्यास पूर्वीच्या अंदाजे तारखानुसार राज्याच्या विविध भागांमध्ये ८ ते १० जूनच्या दरम्यान मोसमी वाऱ्यांच्या आगमनाचा कालावधी देण्यात आला होता. परंतु आता नवीन तारखानुसार ८ ते १६ जून दरम्यान मोसमी वारे आगमनाचे अंदाजे तारीख देण्यात आली. त्यामुळे आगमनाचा कालावधीही काही भागात ६ ते ७ दिवसांनी वाढला आहे. या चालू वर्षीही मोसमी वाऱ्यांच्या आगमन बाबत हीच स्थिती दिसून आली. त्यामुळे राज्यातून मोसमी वारे निघून जाण्याचा कालावधीही अंदाजे तारखांना ते वाढवण्यात आला आहे.
पूर्वीच्या तारखांमध्ये २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत मोसमी वारे राज्यातून परतीचा प्रवास सुरु करायचे. मात्र वातावरणातील अचानक झालेल्या बदलाच्या स्थितीमुळे हे तारीख ७ ते १२ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर आपण पाहिले तर, पुणे आणि मुंबईतील प्रवेश पूर्वीच्या वेळेनुसार अनुक्रमे आठ ते दहा जूनला होता. तो आता १० आणि ११ जून असा झाला आहे. परतीची तारीख या शहरांमध्ये ३० आणि २८ सप्टेंबर अशी होती, ती आता ९ आणि ८ ऑक्टोबर म्हणजे साधारणतः दहा दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नागपूर सारख्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोसमी वारे परतीची अंदाजीत तारीख १० दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. यावर्षी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा प्रवास आणखी काही दिवस लांबून ते काही भागातून २८ ऑक्टोबरला निघून गेले. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर हीट चा कालावधी जाणवलाच नाही थंडीची चाहूल लागली.
Share your comments