बळीराजाचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. असे असताना आता हा धंदा करणे अवघड झाले आहे. आता दूधदरात मोठी घसरण झाली असून 40 रुपयांपर्यंत गेलेले हे दर 32 वर आले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत गेला आहे. पशुखाद्याच्या दरात मात्र मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे आता दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. आता यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दुधाचे दर पाडणाऱ्या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय' अशा घोषणा देत सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचे डाॅ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज रस्त्यावर उतरत दूध दरासाठी आंदोलन केले. यावेळी पंचायत समिती चौकात रास्ता रोको करण्यात आला. दुधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट झाली असतानाही दूध डेअरीकडून दुधाच्या दरामध्ये घट केली आहे.
८०-१०० रुपये लिटर दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करणार! 'या' सरकारचा मोठा निर्णय...
दुसरीकडे पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे दुध उत्पादनाचा खर्च वाढत असून उत्पन्नात घट झाल्याने दुध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान, जर्सी दुभत्या गायींचे प्रमाण जास्त असून आता या पशुपालकांकडे उपलब्ध असणारा चारा संपला आहे.
अशातच पावसानेही दडी मारली असून पशुखाद्यात दरवाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांवर दुहेरी संकट आले आहे. मागील काही दिवसांपासून दुधाचे दर वाढले होते.
अंजीराची शेती कशी करावी, किती उत्पन्न मिळेल, जाणून घ्या...
त्यामुळे पशुपालक दुग्ध व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत होते, मात्र आता ते अडचणीत आले आहेत. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात 8 रुपयांची घसरण, पशुखाद्याच्या दर वाढले, शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
सरकारी वाळू आली! पुणे जिल्ह्यात ११ ठिकाणी सरकारी वाळू उपलब्ध..
नेपियर गवत कोळसा आणि सीएनजी गॅस तयार करणार, जाणून घ्या दुहेरी फायदा..
Share your comments