निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वर्गावर सतत कोणत्या ना कोणत्या तरी संकटाची मालिका सुरूच असते. कधी ऐन हंगामावेळी अवकाळी पाऊस तर कधी गारांचा पाऊस तर कधी धुके यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. परंतु किती जरी संकटे आली तरी शेतकरी बांधव खचून न जाता शेती करतोच. गेल्या वर्षीपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता त्यामुळे खरीप हंगामात सुरू झालेल्या पावसाने रब्बी हंगाम संपल्यावरच विश्रांती घेतली.
गेल्या वर्षी शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान:
सध्या हवामान खात्याने शेतकरी वर्गाला महत्वाचा संदेश पाठवला आहे येत्या 2 दिवसात राज्यात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंघावत असल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची जास्त शक्यता आहे. वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसाला आणि शेतीमधील होणाऱ्या नुकसानाला शेतकरी वैतागून गेला आहे.त्यामुळे गेल्या वर्षी शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच शेतकरी वर्गाचे खरीप आणि रब्बी हंगामात सुद्धा नुकसान झाले आहे खरीप हंगामात ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले शिवाय रब्बी हंगामात रानातच पीक कुजून गेले या मध्ये सर्वात नुकसान हे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे झाले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा एक रुपया सुद्धा बळीराजाला मिळाला नसल्यामुळे शेतकरी वर्ग अवकाळी पावसामुळे त्रस्त झाला होता.
हवामान खात्याने केलेल्या अंदाजानुसार राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या भागात जोरदार अवकाळी पाऊस होईल असा अंदाज केला आहे त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ हे जिल्हे हाय अलर्ट वर आहेत असे म्हटले जात आहे. येत्या 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी येथे अवकाळी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.हवामान खात्याने केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात या ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे शिवाय नुकसान न होण्यासाठी शेतीमधील काही कामे आवरत आहे.
या अवकाळी पावसामुळे आता रब्बी हंगामाला पुन्हा फटका बसण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. याआधीच अवकाळी पावसाने शेतकरी राजाला पूर्णपणे कोलमडून पाडलं आहे. परंतु आता जर नुकसान झाले तर शेतकरी वर्ग पूर्णपणे मातीमध्ये जाईल आणि मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
Share your comments