प्रत्येकाचं हक्काच्या घराचं, तसेच गाडीचं स्वप्न असतं..ते पूर्ण करायचं झालं,तर बहुतांश लोकांसमोर बॅंकांच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नसतो..मात्र, आता तुमचं हे स्वप्नही महाग झालंय..भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (ता. 5) रेपो दरात वाढ केल्यानंतर लागलीच त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.
‘आरबीआय’च्या (RBI) मौद्रिक नीती समितीने रेपो रेटमध्ये 0.50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.. महागाई आटोक्यात आणण्यासाठी ‘आरबीआय’ने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते..It is said that RBI has taken this step.त्यामुळे रेपो दर कोविड काळातील 5.40 टक्क्यांपर्यंत पोहचला. या निर्णयाचे परिणाम लगेच दिसू लागले आहेत.
रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याने बॅंकांचे कर्ज (loan) महागणार असल्याचं बोललं जात होतं.. झालेही तसेच.. खासगी क्षेत्रातील ‘आयसी‘रेपो रेट’ वाढताच ‘या’ बॅंकांचे कर्ज झाले महाग, नागरिकांना बसणार फटका..!!आयसीआय’ (ICICI Bank) व सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
विशेष म्हणजे, रेपो रेटमध्ये 5 ऑगस्टपासून वाढ करण्यात आली.. त्यानंतर याच दिवसापासून या दोन्ही बँकांचा व्याजदर वाढल्याचे जाहीर केलंय.. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. या दोन बँकांनी व्याजदर वाढीचा निर्णय घेतल्यानंतर आता इतर बँकांही तातडीने व्याजदर (Interest rate) वाढविण्याची शक्यता आहे.
बॅंकांनी काय म्हटलंय..?याबाबत ‘आयसीआयसीआय’ बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेत असं म्हटलंय, की ‘आरबीआय’ने रेपो दरात वाढ केल्याने ‘आयसीआयसीआय’ बँकेनेही कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बाह्य मानक कर्ज दर (I-EBLR) आता वार्षिक 9.10 टक्के असून, तो 5 ऑगस्टपासून लागू असेल.
तसेच ‘पीएनबी’च्या माहितीनुसार, ‘आरबीआय’ने रेपो दरात वाढ केल्याने 8 ऑगस्टपासून रेपो संबंधित कर्ज दर (RLLR) हा 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्के केला आहे. ‘आरबीआय’च्या रेपो रेटवर बॅंकांचे व्याजदर अवलंबून असतात. रेपोमधील बदलानुसार बँका कर्जावरील व्याजदरात बदल करीत असतात..
दरम्यान, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ‘आरबीआय’ने रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या पतधोरण आढाव्यात, नीती धोरणानुसार रेपो रेटमध्ये सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आलीय. 2022-23 मध्ये रेपो दरात झालेली ही आतापर्यंत 1.4 टक्के वाढ आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे..
Share your comments