1. बातम्या

एम आय डी सी मधुन असलेला जोडरस्ता पुर्वीप्रमाणे ३०फुटाचा देण्यात यावा- स्वाभिमानी ची मागणी

स्वाभिमानीची प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे मागणी;आंदोलनाचा दिला इशारा

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
एम आय डी सी मधुन असलेला जोडरस्ता पुर्वीप्रमाणे ३०फुटाचा देण्यात यावा- स्वाभिमानी ची मागणी

एम आय डी सी मधुन असलेला जोडरस्ता पुर्वीप्रमाणे ३०फुटाचा देण्यात यावा- स्वाभिमानी ची मागणी

स्वाभिमानीची प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे मागणी;आंदोलनाचा दिला इशारा चिखली- तालुक्यातील खंडाळा म ते एम आय डी सी मार्गे जांभोरा हा रस्ता एम आय डी सी त न्यु प्राईम या कंपनीमुळे अडकुन पडला आहे. शेतकऱ्यांना दुसरीकडुन रस्ता देण्यात आला परंतु तो अरुंद असल्याने तो जोडरस्ता पुर्वीप्रमाणे ३०फुटाचाच देण्यात यावा,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांसहप्रादेशिक अधिकारी अमरावती यांच्याकडे दि२८जुन रोजी स्मरणपत्राव्दारे केली आहे.चिखली एम आय डी सी मधुन जात असलेला खंडाळा म ते जांभोरा हा रस्ता एम आय डी सी ने न्यु प्राईम कंपनीस भुखंड विक्री केल्यामुळे व रस्त्यावरच कंपनी बांधकाम झाल्याने रस्ताच अडकुन पडला आहे.

तर तो न्यु प्राईम कंपनीमधुन असलेला रस्ता पर्यायी रस्ता म्हणुन वळवुन दुसरीकडुन देण्यात आला आहे.परंतु तो रस्ता अरुंद असल्याने खंडाळा येथील शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल ने आण करण्यासाठी व शेतीमशागतीचे कामे करण्यासाठी अडसर ठरत आहे.यामधे ट्रक्टर वाहण सुद्धा जात नाही तर कंपनीने केलेल्या कंपाउंडमुळे वाहन चालवण्यास अडचणी होत आहेत.तर वळन रस्त्यामुळे कंपाउंडला ट्रॅक्टर धडकत आहेत.तर बैलगाडी व ट्रक्टर चिखलामुळे फसत आहे.विशेष म्हणजे या पुर्वीपार असलेल्या खंडाळा म ते एम आय डी सी मार्गे जांभोरा या जोडरस्त्यावर पालकमंत्री पाणंद रस्ता योजने अंतर्गत व लोकसहभाग असे एकुन५लक्ष रुपये खर्च देखील करण्यात आले आहे.

असे असतांना हा रस्ता एम आय डी सी कडुन विक्रीचा घाट घातला असल्याचा आरोप शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन करण्यात आला होता.तर रस्ता पुर्वीप्रमाणे ३०फुट देउन घटनास्थळ पाहणी करण्याची मागणी तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली होती.दरम्याण या रस्त्याची पाहणी करुण मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तहसिलदार चिखली यांना दिलेल्या अहवालामधे सदरील रस्ता हा न्यु प्राईम कंपनीमधून असल्याचे दिसुन येत असुन ३०फुट असल्याचे कळविण्यात आले होते.तर सद्यास्थीतीत असलेला रस्ता वळवुन देण्यात आला आहे व रस्ता अरुंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याचे कळविण्यात आले होते.

असे असतांना सहा महिणे उलटुन देखील एम आय डी सी कडुन मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी अमरावतीचे प्रादेशीक कार्यालय गाठुन तिन तास ठिय्या देत सदरील अडकुन पडलेला जोडरस्ता रस्ता पुर्वीप्रमाणे ३०फुट रुंदीचा करण्यात यावा,एम आय डी सी अंतर्गत असलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे,या अगोदर दिलेल्या पत्रानुसार योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी स्मरणपत्राद्वारे प्रादेशिक अधिकारी श्री पारधी यांच्याकडे करण्यात आली आहे.तर सदर न्याय्य मागण्यांची पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन शेतकऱ्यांसह छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,अमरावतीचे जिल्हाध्यक्ष अमित अढाव,बालाजी ठेंग, रामेश्वर पवार,सुदर्शन पवार,अनंतराव देशमुख, सुभाष पवार यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: The link road from MIDC should be given 30 feet as before - demand of Swabhimani Published on: 02 July 2022, 06:57 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters