अकोला जिल्ह्यातील युवक -युवतीना उद्योजकता प्रशिक्षण घेण्याची या मालिकेतील अंतिम संधी अगदी मोजकेच प्रशिक्षण आता बाकी राहिले आहेत.
शुक्रवार दि. 11मार्च 2022 रोजी युवक युवतीना उपलब्ध प्रशिक्षण खालीलप्रमाणे आहेत
1. गावापातळीवर उत्पादीत कृषि मालावर गावातच प्रक्रिया होऊन पक्का माल शहरात पाठविणेसाठी आवश्यक प्रात्यक्षिक आणि यंत्र सामुग्री प्रत्यक्ष हाताळण्याचा अनुभव घेत व्यावसायिक कृषि प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी आवश्यक "कृषि माल प्रक्रिया तंत्रज्ञान प्रशिक्षण"
स्थळ :- कृषि अभियांत्रिकी कार्यशाळा विभाग, वनविद्या महाविद्यालय विद्यार्थी वसतिगृहाचे समोर, क्रिडांगणाचे गेट क्र.2 मधून प्रवेश करावा.
2. व्यावसायिक शेळी पालन तंत्रज्ञान
प्रशिक्षण स्थळ :- पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
गेट नं 7.
3. व्यवसायाभिमुख सेंद्रिय निविष्ठा निर्मिती तंत्रज्ञान
प्रशिक्षण स्थळ:- शेतकरी सदन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
क्रिडांगणाचे बाजूला गेट क्रमांक 2
वरील प्रमाणे तीनही प्रशिक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील युवक-युवती सकाळी 10:30 वाजेपर्यंत येऊ शकतात.
11 वाजे नंतर प्रशिक्षणामध्ये प्रवेश देता येणार नाही यांची पण नोंद घ्यावी.
प्रशिक्षण घेण्यास इच्छुक युवक युवतीनी अगोदर नोंदणी करने बंधनकारक आहे. प्रशिक्षणार्थी संख्या मर्यादित असल्याने वेळेवर नोंदणी करणेपेक्षा अगोदरच नोंदणी करावी ही विनंती.
अकोला जिल्ह्यातील युवक -युवतीना उद्योजकता प्रशिक्षण घेण्याची या मालिकेतील अंतिम संधी अगदी मोजकेच प्रशिक्षण आता बाकी राहिले आहेत.
प्रशिक्षण वर्गा संदर्भात आपल्या काही अडचणी असल्यास तसेच नोंदणी साठी कृपया श्री. निखिल डाबेकर मोबाईल क्रं. 9405471844 यांना संपर्क करावा.
Share your comments