कोकणातील ठाणे, रत्नागिरी, सिंदुधुर्ग जिल्ह्यांतील अनेक भागांत दोन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस सुरु आहे. तर पालघर, रायगड जिल्ह्यांतील सर्वदूर जोरदात ते मुसळधार पाऊस कोसळला आहे.
मंगळवार पासून (दि.१८) कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात सर्वदूर हलक्या पावसाची हजेरी सुरु आहे.
हवामान खात्याने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई शहर, उपनगर, ठाणे जिल्ह्यांत सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मुंबई शहर व उपनगरात मंगळवारी विशेषतः पहाटे २.३० ते ५.३० दरम्यान पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
English Summary: The intensity of rain will increase in the state Weather Rain UpdatePublished on: 19 July 2023, 10:11 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments