गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर कमी झाले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. यामुळे दुधाचे दराला हमीभाव देण्याची मागणी केली जात आहे.
त्यामुळे पशुपालक मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे किफायतशीर आणि गुणवत्तापुर्ण पशुखाद्य उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून राज्य शासनाने पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यामुळे आता तरी भाव मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेतखाली झालेल्या बैठकीत दूधाचे दर, पशुसंवर्धन गुणवत्ता आणि दर नियत्रंण या प्रश्नांबाबत चर्चा झाली.
समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
यावेळी दूध उत्पादक सहकारी संस्था, खासगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपन्या आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विखे पाटील यांच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन गुणवत्ता आणि दर नियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सुक्या चाऱ्याची योग्य साठवण कशी करावी जाणून घ्या..
पशुसवंर्धन आयुक्तांच्या अध्यतेखाली समितीत सहकारी दूध संघ, खाजगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपनी, पशूपालकांचा समावेश आहे. यामुळे पशुखाद्याचे दर आणि दुधाचे दर याचा ताळमेळ बसला पाहिजे.
रुंद वरंबा व सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी मुरते, पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर
जुलैमध्ये साखर विक्रीचा कोटा वाढवला, केंद्र सरकारचा निर्णय
शेळीच्या दुधापासून खवा, पनीर, चीज, आरोग्यासाठी आहे फायदेशीर
Share your comments