बदलत्या काळानुसार शेतीपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत चाललेला आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी उत्पादनाच्या दिशेकडे ओळत चाललेला आहे. मात्र पाणी जर नसेल तर शेती व्यवसाय हा अपूर्णच राहील. पाणी हे शेतीसाठी खूप महत्वाचे आहे मात्र भारतात या गोष्टीकडे दुर्लक्ष होत चालले आहे. मात्र इस्त्राईल मध्ये सांडपाण्याचा वापर करून शेती व्यवसायात मोठा बदल केलेला आहे. फक्त पिण्यासाठी च पाणी आवश्यक नाही तर पुढे शेतीसाठी कसा पाण्याचा वापर करता येईल हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. मुंबई मधील विलेपार्लेमधील बी.जे सभागृहात ब्रह्मा रिसर्च फाउंडेशन या स्ट्रॅटेजीक रिसर्च थिंक टॅंक ने आयोजित केलेले इंडिया वॉटर व्हिजन 2040 अँड बियोंड राष्ट्रीय जल परिषदेत आपले मत मांडताना पाण्याचे महत्व किती आहे हे स्पष्ट करून दाखवले. त्यामध्ये सर्वात केंद्रस्थानी मुद्धा होता तो शेतीसाठी पाण्याचा मुद्धा.
पीक पद्धतीत बदल मात्र सिंचनव्यवस्थेचे काय?
भारत देशात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतपद्धतीमध्ये बदल केला आहे मात्र असे खूप शेतकरी आहेत त्यांनी सिंचनव्यवस्थेत बदल केलेला नाही. आजच्या स्थितीला सुद्धा अनेक शेतकरी पाठद्वारे शेतीला पाणी देत आहेत मात्र दुसरीकडे इस्त्राईल देशात कृषी क्षेत्राने ठिबक सिंचनाचा शोध लावून पूर्ण शेती सूक्ष्म सिंचनावर आणली. शेतीसाठी पूर्णवापर केलेले पाणी वापरण्यास सुरुवात झाली. हाच जर प्रयोग भारतामध्ये आजमवला तर मोठा फायदा होणार असल्याचे जल परिषदेत सांगितले.
इस्त्राईल देशात शेतीसाठी पाण्याचे केले असे नियोजन :-
इस्त्राईल देशात दुष्काळ संकटावर मात करण्यासाठी पाच भूमिजल प्रकल्प सुरू करण्यात आले.घरगुती वापरासाठी लागणारे जे पाणी आहे त्या पाण्यांपैकी ७५ टक्के पाण्याची निर्मिती केली जाते. यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सांडपाणी नियोजन. इस्त्राईल मध्ये पाण्याचे सर्व नियोजन हे सांडपाण्याशी जोडलेले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी ते वापरले जाणाऱ्या पाण्याच्या बाबतीत इस्त्राईल देश हा आघाडीवर आहे. जर भूगर्भातील जल व्यवस्थापन शाश्वत करायचे असेल तर भूगर्भातील जलसंचयन वाढवणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी जो पडणारा पाऊस आहे तो जमिनीत मुरवणे गरजेचे आहे असे इस्त्राईल च्या कोब्बी शोशानी सांगितले.
बोअर घेणे हे जलव्यवस्थापणाच्या विरोधातील कृत्य :-
आजकाल पाण्यासाठी जास्तीत जास्त लोक बोअर घेत आहेत मात्र बोअर घेण्याने पाण्याचा अनियंत्रित वापर होतो.त्यामुळे इस्त्राईल ने तेथील नागरिकांसाठी दिवसरात्र पाणी उपलब्ध करून दिले आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे इस्त्राईल मध्ये ९० टक्के पाणी सांडपाण्याचा पुनर्वापर करून केला जातो. तेथील नागरिकांना या पद्धतीचा वापर करून रात्रंदिवस पाणी पुरवले जाते.
Share your comments