पुणे : शेतीचे बरीच कामे यंत्राने केली जात आहेत. यंत्राच्या साहाय्याने जलदगतीने शेतीची कामे पूर्ण होत असतात. परंतु ही यंत्रे इंधनावरीत चालणारी असल्याने यातून कार्बनचा उत्सर्जन होत असते. याचे काय प्रमाण आहे याची कल्पना आपल्याला नाही. किती प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होते हे मोजण्यासाठी वेगळे मापन नसल्याने किती कार्बन उत्सर्जित केला जातो याची नोंद आपल्याकडे नाही. याची नोंद करण्यासाठी सरकार कार्बनची मोजणी वेगळ्या पद्धतीने केली जाणार आहे.
केंद्र सरकार, शेतीतील यंत्रामुळे होणारे कार्बनचे उत्सर्जन मोजण्यासाठी वेगळे निकष लावणार आहे. शेतीत लागणारी वाहने आता भारत स्टेज मापकांमध्ये नो मोजता आता वेगळ्या पदतीने मोजले जाणार असल्याचे माहिती सरकारने दिली आहे.
त्यासाठी सरकारने जनतेतून आणि तज्ञ लोकांकडून सूचना मागण्यास सुरुवात केली आहे. अनेकवेळा उत्सर्जनाचे नियम लावताना साधी वाहने आणि शेतीतील वाहने यामध्ये संभ्रम निर्माण होतो. भारत स्टेज, १, २ च्या धर्तीवर हे असे मॉडेल असणार आहे. यामुळे शेतीतील वाहनाचा फायदा होणार आहे. भारत सतेज फोरच्या धर्तीवर टर्म १, २ , ३ आणि ४ अशी रचना असणार आहे. साधारपणे टर्म स्टेज-४ ची अंबलबजावणी १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. वाहनांमुळे होणारे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने वाहनाच्या इंजिनांमध्ये सुधारणा आणण्याचे ठरवले आहे. आता शेतीतील यंत्रे, वाहने यांच्यासाठी ही नवीन प्रणाली सरकार आणत आहे.
Share your comments