1. बातम्या

कृषी ग्राहकांपर्यंत जास्त फायदा पोहोचवण्यासाठी सरकार राबवणार कृषी ऊर्जा पर्व

राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिवसा ८ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवा कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा , कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती व सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग व कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य सरकारने कृषी पंप वीज जोडणी धोरण जाहीर केले आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
कृषी ऊर्जा पर्व

कृषी ऊर्जा पर्व

राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिवसा ८ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवा कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा , कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती व सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग व कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य सरकारने कृषी पंप वीज जोडणी धोरण जाहीर केले आहे.

या पर्वाचा शुभारंभ १ मार्च दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन द्वारे करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित राहणार आहेत. या पर्वात संबंधित जिल्ह्यांचे पालकममंत्री, खासदार, आमदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व कृषी ग्राहक प्रतिनिधींच्या उपस्थिती जिल्हा, तालुका स्तरावर व मोठ्या गावांमध्ये कृषी ग्राहक मेळावे आयोजित केले जाणार आहेत.

यात माझे वीजबिल, माझी जबाबदारी मोहिमेस सुरुवात केली जाणार असून थकबाकीमुक्त झालेल्या ग्राहकांचा सत्कार, नवीन कृषी ग्राहकांना वीज जोडणी मुंजुरीचे कोटेशन, वीजजोडणी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. याबरोबरच ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदांच्या समन्वयाने ग्रामसभा आयोजित करुन त्यात कृषी वीज धोरणाची महिती दिली जाणार आहे.

 

महिला सक्षमीकरण - महावितरणाचा पुढाकार या संकल्पनेअंतर्गत ८ मार्च रोजी जागतिक दिनाचे औचित्य साधून थकबाकी भरणाऱ्या महिलांचा सत्कार , महिलांच्या नावावर वीज जोडणीस प्राधान्य, थकबाकी वसुली करणाऱ्या महिला सरपंचांचा तसेच महिला जनमित्रांचा व ऊर्जामित्रांचा सत्कार, महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, महिला बचत गटांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.धोरणाच्या प्रचारासाठी  जिल्हा परिषदा, जिल्हाधिकारी कार्यालये , तहसील व पंचायत समिती कार्यालये, बस स्थानके, रेल्वे स्थानके, कृषी बाजारपेठा, मार्केट यार्ड, आदी ठिकाणी प्रचार केला जाणार आहे.

ग्राहक संपर्क अभियानात कृषी थकबाकीदार ग्राहकांना एसएमएस व सोशल मीडियाद्वारे धोरणाची माहिती देण्यात येणार आगे. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटून या धोरणात थकबाकी भरल्यास होणाऱ्या फायद्याची माहिती दिली जाणार आहे. तसेच कृषी ग्राहकांच्या शंकांचे निरसन करुन वीज बिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे, याबरोबरच जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यांतील शासकीय कर्मचाऱ्यांचे तसेच शालेय शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रबोधन, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण एक दिवस देश रक्षकांना थकबाकीमुक्त गावांचा व शेतकऱ्यांचा सन्मान, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, वीज सुरक्षा कॅपॅसिटरचे महत्त्व, शेतकऱ्यांच्या पैसा, त्यांच्याच पायाभूत सुविधांसाठी, वासुदेव, पथनाट्ये, टीव्ही व रेडिओ मुलाखती आदी उपक्रमांद्वारे जवळपास दीड महिना चालणाऱ्या या मोहिमेद्वारे जनजागृती करुन महावितरणतर्फे कृषी वीज ग्राहकांना वीज बील भरण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.

English Summary: The government will launch an krishi uraja parva Published on: 28 February 2021, 06:32 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters