शेतकऱ्यांच्या मागे लागलेली महागाई काही केल्याने कमी होताना दिसत नाही. याउलट ती वाढतच चालली आहे. यामुळे शेती करायची तरी कशी असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. खतांच्या किमतीत मोठी वाढ होत असताना आता अजून यात मोठी भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्याची भीती होती तेच अखेर खरिपाच्या तोंडावर घडले आहे. या हंगामात (DAP Fertilizer) डीएपी खताची सर्वाधिक मागणी असते.
आता याच खताच्या दरात तब्बल १५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे डीएपी खताची बॅग ही आता 1 हजार 350 रुपयांना मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यासाठी पीपीएल या कंपनीचे एक हजार टन डीएपी खत प्राप्त झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. तसेच इतर खते देखील वेळोवेळी वाढत आहेत. यामुळे सरकारने शेतकऱ्यांना उबजारी येऊ द्यायच नाही असं ठरवलं असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
हे खत वापरल्याने पिके चांगली येतात, असा अनेक शेतकऱ्यांचा समज आहे. मात्र जमिनीची सुपीकता यामुळे कमी होत आहे. यामुळे याची मागणी मात्र अनेकदा वाढवली जात आहे. खरीप हंगामाच्या अनुशंगाने आतापासूनच मागणीनिहाय खताचा पुरवठा करण्यावर सरकारने भर दिला आहे. त्यामुळे ऐनवेळी मागणीत वाढ आणि पुरवठा कमी अशी परस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारकडून एवढे नियोजन केले जात असले तरी दरावर नियंत्रण ठेवण्यास अपयश आले आहे. यामुळे शेतकरी नाराज आहे. खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, हरभरा आणि गव्हासाठी याच खताचा अधिकचा वापर केला जातो. दरवर्षी डीएपी खताच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. असे असूनही मागणीच्या तुलनेत पुरवठा हा होत नाही. यामुळे उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही.
असे असताना कृषी विभागाकडून वेगवेगळ्या खताचा वापर करण्याचे आवाहन केले जात असले तरी शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेणखताचा वापर वाढवण्याचे देखील आवाहन करण्यात येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात अशीच परिस्थिती राहिली यात अजून देखील वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या या संधीचा फायदा अनेकजण घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
काल वाह वाह आज थू थू!! पुणे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांचा प्रताप उघड..
बारामतीच्या पिवळ्या कलिंगडांची जयंत पाटलांना भुरळ, म्हणाले बारामतीकरांकडे..
आता शेतातील पाचट जाळली तर होणार गुन्हा दाखल, 15 हजारांचा दंडही होणार
Share your comments