1. बातम्या

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारने नाही दिली मदत – फडणवीस

KJ Maharashtra
KJ Maharashtra

पुणे – दिल्लीच्या वेशीवर गेल्या एक महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरु असताना भाजपाकडून संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत आणि खासकरुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून संवाद यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेतून राज्यातील विरोधी पक्षात असलेले भाजप केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायदे कशी चांगली आहेत याचा प्रचार करणार आहेत.

केंद्राचे नवे कायदे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करणारे आहेत.मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. पण फक्त राजकारणासाठी मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचे चित्र रंगवले जात आहे, असेमाजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातील मांजरी इथं आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

 

या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे,राहुल कुल, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी फडणवीस यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांचा विस्ताराने आढावा घेतला. ते म्हणाले की, मोदी सरकारने साखरेची किमान खरेदी किंमत निश्चित केली. याचा फायदा कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला. इथेनॉल वापराला प्रोत्साहन दिल्यामुळे यापुढील काळात साखर कारखाने उसाला चांगला भाव देऊ शकणार आहेत. राज्य सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना काहीच मदत केली नाही, असेही ते म्हणाले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters