1. बातम्या

चांगली बातमी:कोरोना संकटाच्या काळात या कंपन्या 1 लाख लोकांना नोकरी देतील

KJ Maharashtra
KJ Maharashtra
employ 1 million people

employ 1 million people

कोरोनाव्हायरस सर्व देशभर पसरला आहे पण भारतातील आयटी व्यावसायिकांसाठी एक चांगली बातमी आहे. यावर्षी आयटी क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक यावर्षी त्यांच्या कंपन्यांमध्ये सुमारे 1 लाख नवीन लोकांना नोकरी देतील.

इतर कंपन्यानी यांच्याकडून आदर्श घेणे जरुरीचे आहे :

टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक देशातील चार मोठ्या आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मोठी पावले उचलत आहेत. या चार कंपन्या यावर्षी देशातील सुमारे 1 लाख फ्रेशर्सना नोकर्‍या देतील. या आयटी कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्के अधिक रोजगार दिले आहेत. त्यांच्या कामकाजाचे डिजिटायझेशन करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढल्यामुळे सॉफ्टवेअर सेवेची मागणी पूर्ण झाली आहे.आयटी व्यावसायिकांना नोकरी देण्याची ही प्रक्रिया पगाराची वाढ आणि बोनससह सुरू राहील.

हेही वाचा:SBI Recruitment 2021: स्टेट बँकेत विविध पदांवर भरती, जाणून घ्या अर्जाची तारीख

जगातील सर्वात मोठी आयटी कंपन्यांपैकी एक टीसीएसने म्हटले आहे की, वित्तीय वर्ष 22 मध्ये ही कंपनी 40 हजार नवीन लोकांना नोकर्‍या उपलब्ध करुन देईल आणि या कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांची संख्या 5 लाखाहून अधिक होईल. त्याचबरोबर या आर्थिक वर्षात इन्फोसिसतर्फे 26 हजार नवीन लोकांना नोकर्‍या मिळतील तर यावर्षी एचसीएल टेककडून 12 हजार लोकांना नोकरी दिली जाईल.

तथापि, यावर्षी किती लोकांना नवीन नोकर्‍या देण्यात येतील हे विप्रोने सांगलेले नाही परंतु कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गिल म्हणाले की, कंपनीला गतवर्षीच्या तुलनेत वर्ष 2022 मध्ये जास्त नोकर्‍या दिल्या जातील. मागील वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीने 9 हजार नवीन लोकांना नोकर्‍या दिल्या होत्या.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters