कोल्हापूर: ग्रामीण तसेच देशाच्या आर्थिक बाबीत कृषी क्षेत्राचे महत्व अधिक आहे. शेती व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतात. नाही म्हटलं तरी ७०% जनता ही शेती आणि शेती संबंधी व्यवसायाशी निगडित आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात अधिकाधिक वृद्धी व्हावी यासाठी राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर अनेक उपक्रम आणि योजना आखल्या जातात. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्या त्या विषयासंबंधीचे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि माहिती दिली जाते.
आता राज्यात मधमाशी मित्र तयार करण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २५ जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नागरी वस्तीत मधमाशांच्या पोळ्याची संख्या अधिक आहे. मधमाशांची भली मोठी पोळी पाहून कोणालाही भीती वाटेलच.
आपल्या आजूबाजूला कधी मोठ्या इमारतींच्या कोपऱ्यात, कधी झाडांवर पोळी ठाण मांडून बसतात. कधी कधी अशा मधमाशी पोळ्यांमुळे कामात बराच अडथळा निर्माण होतो. चुकून धक्का लागला तर मधमाशा पोळ्यातून बाहेर पडल्या तर अधिक धोकादायक ठरू शकते. मधमाशीच्या चाव्याने मृत्यू झालेल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.
त्यामुळे बऱ्याचदा मधमाशांची पोळी जाळून काढली जातात. मात्र यातून मधमाशांच्या मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. तसेच पोळी जाळल्याने शुध्द मधही वाया जातो. त्यामुळे असे प्रकार टाळावे यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. ही हेल्पलाईन असणार आहे 'मधमाशी मित्रांसाठी. ' या हेल्पलाईनद्वारे नागरिकांना मधमाशी मित्रांशी संपर्क साधता येणार आहे. हळू हळू मधमाशी मित्रांची संख्या वाढवली जाणार आहे. एवढंच नाही तर या कार्यासाठी मधमाशी मित्रांना जिल्हा प्रशासनाकडून प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितली आहे.
पावसा आता तरी पड रे! पावसाअभावी तब्बल २७ लाख हेक्टरमध्ये पेरणी थबकली
नागरिकांनाही मधमाशीमुळे त्रास होणार नाही आणि मधमाशांनाही कोणताही त्रास होणार नाही यासाठी मधमाशांची पोळी सुरक्षितपणे काढणे महत्वाचे आहे.
यासाठी जिल्हा प्रशासनाचा मधमाशी मित्र ही संकल्पना राबवण्याचा विचार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात २५ जणांना याबाबतचे तंत्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमातून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. तसेच यातून आग्या माशी वाचवता येईल. आणि सोबतच तरूणांना रोजगारही उपलब्ध होईल, असे महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
आता 'ई-चावडी' उपक्रम ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान; राज्य सरकारचा मोठा निर्णय
137.28 लाख टन, साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानी
Share your comments