आपण ग्रामीण भागामध्ये नजर टाकली तर नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांची मुलं काय करतात याची खऱ्या अर्थाने जाणीव होईल. ते नेहमी च यशस्वीतेच्या मार्गाकडे धाव घेत असतात. कुणी शिक्षणात , कोणी खेळात, तर कोणी सांस्कृतिक क्षेत्रात तर अशाच प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कवठळ या छोट्याश्या गावातील शेतकरी कुटुंबातील कुणाल डीगांबर कऱ्हाडे आणि गोपाल खंड ता. सिंदखेडराजा गाव तांदुळवाडी या दोन युवकांनी खेळाप्रती असलेले प्रेम आणि प्रचंड मेहनत करण्याच्या बळावर शेतकऱ्याच्या मुलाने क्रिकेट खेळातून पंचक्रोशीत एक नवी ओळख तयार केली आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये तो अष्टपैलू (ऑल राऊंडर) खेळाडू म्हणून खेळला त्या ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट बाजी मारली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट असलेल्या मोनटेक्स बॉल क्रिकेट ची अधिकृत फेडरेशन कप अकरावी राष्ट्रीय अजिंक्यपद मोंटॅक्स बोल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२१-२२ साठी त्यांची निवड झाली आहे. यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होतांना दिसत आहे.
आता दिनांक 25 26 27 फेब्रुवारी 2022 यादरम्यान भवभूती महाविद्यालय आमगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा तो बाजी मारेल असा कुणाल चा विश्वास आहे. कुणाल आणि गोपाल ची पार्श्वभूमी शेती ची असून कुणाल हा आदर्श विद्यालय चिखली या शाळेतून दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर तो गावामध्ये व आसपासच्या खेड्या वरती जाऊन क्रिकेटचे सामने खेळायचा, लहानपणापासून क्रिकेट खेळात त्याला आवड होती.
सामण्यांमध्येही तो अव्वल असायचा. आता मात्र तो यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. भवभूती महाविद्यालय आमगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये तो बाजी मारणार असा त्यांनी विश्वास दिला आहे. यामुळे त्याच्या भविष्याच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष केंद्रित होत आहे. सध्या कुणाल आणि गोपाल च्या पाठीवर विविध क्षेत्रातील लोकांची कौतुकाची थाप पडत आहे.
Share your comments