1. बातम्या

शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार; गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात काढली मिरवणूक

योग्य मार्गदर्शन, जिद्द, परिश्रम आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यशापासून कोणीही रोखू शकत नाही. घरची जेमतेम आर्थिक परिस्थिती, घरात कोणाला शिक्षणाचा फारसा गंध नाही. अशा वातावरणात दापुरी खुर्द येथील शेतकरीपुत्र जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या बळावर फौजदार (पोलीस उपनिरीक्षक) बनला आहे.

Police sub-inspector

Police sub-inspector

दापुरी खुर्द (वाशिम) : घरची जेमतेम आर्थिक परिस्थिती, घरात कोणाला शिक्षणाचा फारसा गंध नाही. अशा वातावरणात दापुरी खुर्द येथील शेतकरीपुत्र जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या बळावर फौजदार (पोलीस उपनिरीक्षक) बनला आहे. या यशाबद्दल संपूर्ण गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत त्यांच्या जिद्दीला अनोखी सलामी दिली.

दापुरी खु .जिल्हा वाशिम येथील शेतकरी विलास जाधव यांचा मुलगा सचिन जाधव याने २०१९ ची महाराष्ट्र आयोगाची परीक्षा दिली होती. परंतु कोरोनामुळे निकाल लांबणीवर पडला होता. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

महत्त्वाच्या बातम्या :
एप्रिल महिन्यात 'या' भाज्यांची लागवड करून कमवा लाखोंचा नफा..!
निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले, मात्र 'या' पिकाला मिळतोय 'सोन्या'चा भाव

सचिन हा पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याचे आई, वडील शेतकरी असून, शिक्षणाचा त्यांना कोणताही वारसा नाही. सचिनने मात्र शिक्षण घेऊन फौजदार होण्याचे स्वप्न बाळगले होते. जिद्द, चिकाटी, परिश्रम व अभ्यासातील या बळावर सचिनने सातत्य फौजदाराचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. योग्य मार्गदर्शन, जिद्द, परिश्रम आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यशापासून कोणीही रोखू शकत नाही. असे सचिन म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या :
नुकसान झाले तरी हार मानली नाही; दोन महिन्यात शेतकरी झाला मालामाल
Summer Plants: उष्णतेमुळे त्रास होतोय, घराला थंड ठेवायचे आहे तर लावा 'ही' झाडे

English Summary: The farmer's son became a police sub-inspector Published on: 03 April 2022, 04:15 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters