1. यशोगाथा

शेतकरी पुत्राची कमाल! कसा एका शेतकऱ्याचा पोरगा अरबपती होतो? वाचा शेतकरी पुत्राची यशोगाथा

कुठल्याही क्षेत्रात अहोरात्र केवळ कष्ट कष्ट आणि कष्टच केले तर यश संपादन करणे काही अवघड नाही. अहोरात्र काबाडकष्ट करून मेहनत जिद्द चिकाटी या गुणधर्मांची सांगड घालून कोणताही व्यक्ती समाजात एक मानाचे स्थान काबीज करू शकतो नव्हे नव्हे तर अरबपती सुद्धा बनू शकतो मग तो शेतकऱ्याचा का मुलगा असेना. याचेच एक जिवंत उदाहरण आहेत आर पी ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन बी रवी पिल्लाई.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
शेतकरी पुत्राने खरेदी केल हेलीकॉप्टर रचला इतिहास

शेतकरी पुत्राने खरेदी केल हेलीकॉप्टर रचला इतिहास

कुठल्याही क्षेत्रात अहोरात्र केवळ कष्ट कष्ट आणि कष्टच केले तर यश संपादन करणे काही अवघड नाही. अहोरात्र काबाडकष्ट करून मेहनत जिद्द चिकाटी या गुणधर्मांची सांगड घालून कोणताही व्यक्ती समाजात एक मानाचे स्थान काबीज करू शकतो नव्हे नव्हे तर अरबपती सुद्धा बनू शकतो मग तो शेतकऱ्याचा का मुलगा असेना. याचेच एक जिवंत उदाहरण आहेत आर पी ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन बी रवी पिल्लाई.

बी रवी पिल्लाई एका गरीब शेतकऱ्याचे पुत्र आहेत आणि आता बी रवी पिल्लाई जगातील श्रीमंतांच्या यादीत येणारे एक चर्चित नाव आहे. सध्या बी रवी पिल्लाई सोशल मीडियापासून ते नॅशनल मीडिया पर्यंत सर्वच ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहेत. चर्चेचा विषय ठरली याचे कारण असे की नुकतेच बी रवी पिल्लाई यांनी शंभर कोटी रुपयांचे एक हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. बी रवी पिल्लाई यांनी 100 कोटींचे एयरबस एच-145 हेलिकॉप्टर खरेदी केले.

भारतात हेलिकॉप्टर केवळ बी रवी पिल्लाई यांच्याकडेच आहे. त्यामुळे बी रवी पिल्लाई शेतकऱ्यांच्या बांधा पासून ते जागतिक मीडियामध्ये मोठ्या चर्चेत आहेत. बी रवी पिल्लाई यांनी खरेदी केलेले हेलिकॉप्टर केवळ भारतातच पहिलं आहे असं नाही तर आशिया खंडात देखील त्यांनी खरेदी केलेले हेलिकॉप्टर दुसर कुणाकडेच नाही. वाचून बसला ना शॉक! पण जेव्हा एका शेतकऱ्याचा पोरगा अरबपती बनतो तेव्हा तो काय करू शकतो? याचे हे एक जिवंत उदाहरण असून यामुळे अनेक शेतकरीपुत्र प्रेरित होतील आणि देशात अनेक अनेक बी रवी पिल्लाई भविष्यात बघायला मिळतील एवढे मात्र नक्की.

शेतकऱ्याचा पोरगा आहे बी रवी पिल्लाई- अरबपती रवी पिल्लई यांचा जन्म 2 सप्टेंबर 1953 रोजी केरळमधील मौजे चावरा या ठिकाणी झाला. मित्रांनो आपणास सांगण्यात अत्यंत आनंद होतो की, रवी पिल्लई यांचे वडील शेतकरी होते, हो बरोबर ऐकल आपण रवी पिल्लाई एक शेतकरी पुत्र आहेत. रवी पिल्लाई लहान असतांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीतून होत असे. रवी पिल्लई यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. अशा परिस्थितीत, स्थानिक महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर, त्यांनी कोची विद्यापीठातून बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीएचे पदव्युत्तर शिक्षण घेतले.

उधारीने पैसे काढले आणि बिझनेस थाटला- शिक्षण पूर्ण केल्यानंतर रवी यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. रवी यांचे लहानपणापासून व्यवसाय करण्याचे स्वप्न होते. त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता, पण त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. असं असले तरी इच्छा असेल तर मार्ग दिसतो याप्रमाणे, त्यांनादेखील व्यवसाय करण्यासाठी एक छोटासा मार्ग दिसला. त्यांनी स्थानिक सावकाराकडून 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःची चिट-फंड कंपनी सुरू केली.

व्यवसायाची पायाभरणी केल्यानंतर या व्यवसायातून रवी यांना चांगला प्रॉफिट मिळायला लागला. त्यांनी व्यवसायातून हळूहळू पैसे कमवले आणि कर्जाची परतफेड देखील केली. अर्ज फेडल्यानंतर रवी यांनी नफ्याचे पैसे जमा केले.

यानंतर त्यांनी स्वत:च्या पैशातून एक बांधकाम कंपनी सुरू केली. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर रवी पिल्लई यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण जिद्दीचा महामेरू रवी पिल्लाई यांनी हार मानली नाही आणि पुढे जात राहिले. एका रिपोर्टनुसार, आज तो 2.5 मिलियन डॉलर्सचा मालक आहे.  रवी पिल्लाई यांच्या कंपनीत आजच्या घडीला 70 हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.

संबंधित बातम्या:-

मानलं भावा! "या" नवयुवक शेतकऱ्याने अवघ्या 12 गुंठ्यात कमवले 4 लाख; वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

आनंदाची बातमी! 'या' योजनेमुळे भंडाऱ्यातील 85 हजार लोकांना मिळाला रोजगार

English Summary: how son of farmer become millionaire read more about it Published on: 24 March 2022, 08:19 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters