दिल्लीतील शेतकरी आंदोलन म्हणजे तमाशा - पाशा पटेल

10 February 2021 06:38 PM By: भरत भास्कर जाधव

नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला राजकीय स्वरूप मिळालं आहे. आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू आहे, अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे. पाशा पटेल यांनी यावेळी शरद पवार कृषी कायद्यांवरील चर्चेदरम्यान शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते? अशी विचारणादेखील केली आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“दोन महिन्यांहून अधिक काळ राजधानीत आंदोलन सुरू आहे. केंद्र शासनाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांशी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य करूनही विरोध सुरू असून तो नेमका कशासाठी आहे याचे गमक कळलं नाही. शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावावरून तमाशा करण्यात रस आहे,” अशी टीका पाशा पटेल यांनी केली आहे.पाशा पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकेची तोफ डागली. “शरद पवार राज्यसभेचे सदस्य आहेत. राज्यसभेमध्ये शेतकरी कायद्यांवर चर्चा सुरू होती त्यावेळी शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते?,” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मोठी गंमत आहे. शेतकऱ्यांना सरकारचे मत ऐकायचे नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी, असा प्रकार सुरू आहे. सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला तयार असताना शेतकऱ्यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे. त्यांना प्रश्न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, असा टोला पाशा पटेल यांनी लगावला.

 


 सदाभाऊ खोत फुटले नसते तर ते भाजपसोबत असते. तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेईमान कसा ? अशी विचारणाही पटेल यांनी केली. राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती असा टोलाही त्यांनी लगाविला.

pasha patel delhi शेतकरी आंदोलन राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल Pasha Patel former chairman of the State Agricultural Prices Commission former chairman of the State Agricultural Prices Commission राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष
English Summary: The farmers' movement in Delhi is a spectacle - Pasha Patel

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.