देशात सध्या टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे शेतातील टोमॅटोची चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यामुळे शेतकरी त्या शेतात आपला मुक्काम करत आहेत. सध्या अनेक ठिकाणी शेतकऱ्याचे टोमॅटो चोरी गेल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळत आहेत.
दिवसभर काम करून रात्र देखील जागून काढावी लागत आहे. दरम्यान आता सध्या एक शेतकरी चर्चेचा विषय ठरत आहेत. औरंगाबादच्या एका शेतकऱ्याने टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून चक्क आपल्या टोमॅटोला सीसीटीव्ही लावला आहे.
शेतकऱ्याचा दीड एकर टोमॅटो असून या शेतकऱ्याने संपूर्ण शेतीभोवती सीसीटीव्ही बसवले आहेत. गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्याने ही शक्कल लढवली आहे. शरद रावते असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
दरम्यान, काही दिवसापासून टोमॅटोला चांगले दर मिळत असून अनेक ठिकाणी 200 रुपये किलोवर जाऊन दर पोहोचले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगलेच मालामाल झाले आहेत. काही शेतकरी करोडपती झाले आहेत.
'घोडगंगा'च्या कामगारांचा विषय थेट अजित पवारांकडे, कामगारांची देणी द्या, अजित पवार यांची सूचना
टोमॅटोला जास्तीचा दर मिळत असल्याने यावर चोरांची नजर पडली आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शहापूर या ठिकाणच्या शरद रावते यांच्या शेतामधील टोमॅटो चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या गोष्टीला आळा बसण्यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवत पिकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
जप्त केलेली वाळू घराकुलासाठी मोफत वाटप, महसूल विभागाचा निर्णय..
Share your comments