सोलापूरमध्ये सध्या सुरू असलेल्या आंबा महोत्सावात एका शेतकऱ्याने चक्क एका आंब्याचा जातीला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे नाव दिले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे. या आंब्याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.
दत्तात्रय गाडगे असे या शेतकऱ्याचे नाव असून माढा तालुक्यातील अरण मधील रहिवाशी आहेत. गाडगे यांच्या अडिच किलोच्या आंबा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गाडगे यांच्या या आंब्याला ग्राहकांकडूनही चांगली मागणी मिळत आहे.
दरम्यान, गाडगे यांनी आंब्याच्या कलमावर अनेक प्रयोग करून अडिच किलोचा आंबा पिकवला आहे. गाडगे यांच्या शेतात या कलमाची जवळपास २० ते २५ झाडे आहेत. त्यांनी या आंब्याला 'शरद मँगो' असे नाव दिले आहे.
ऊस उत्पादकांची देयके पंधरा दिवसांत द्या, नाहीतर सहकार मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी फळबाग योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. याच योजनेतून आठ एकरमध्ये सात हजार आंब्याची झाडे लावल्याचे गाडगे यांनी सांगितले आहे.
16 गोणी कांदा, पट्टी लागली 71 रुपये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी...
यामुळे अडीच किलोच्या आंब्याला गाडगे यांनी शरद मँगो असे नाव दिले आहे, असे त्यांनी सांगितले आहे. देशात पहिल्यांदाच अडीच किलो वजनाच्या आंब्याचे उत्पादन झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तेलंगणामध्ये सरकार करणार हमीभावाने ज्वारीची खरेदी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
KJ Chaupal मध्ये भारत आणि ब्राझीलमधील सहकार्य आणि सांस्कृतिक संबंधावर चर्चा
Share your comments