1. बातम्या

वाईन संबंधी सरकारचा निर्णय आणि महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनाची परिस्थिती

सरकारने नुकताच एक निर्णय जाहीर केला की महाराष्ट्रामध्ये सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली. सरकारने जाहीर केलेल्या या नव्या अध्यादेशात म्हटले आहे की, या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the grape

the grape

सरकारने नुकताच एक निर्णय जाहीर केला की महाराष्ट्रामध्ये सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली. सरकारने जाहीर केलेल्या या नव्या अध्यादेशात म्हटले आहे की, या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

तसेच महाराष्ट्रातील वाईनरिंना लागणाऱ्या कच्च्या मालाला शाश्वत बाजारपेठ मिळून चांगला भाव मिळेल असा सरकारचा अंदाज आहे. परंतु  वाइन उद्योगासाठी लागणारे द्राक्ष वाणांचे किती टक्के महाराष्ट्र मध्ये लागवड होते? तसेच या निर्णयाचा कितपत फायदा शेतकऱ्यांना होईल हे बघणे महत्त्वाचे आहे.

 जर द्राक्ष उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त द्राक्षाचे उत्पादन घेतले जातात. त्यातही खाण्यासाठी बाजारात येणारी द्राक्ष या वाणाची म्हणजेच टेबल ग्रेप्स त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

सहसा हे द्राक्ष वायनरी साठी वापरण्यात येत नाहीत. या वाणापासून देखील चांगल्या प्रकारची वाइन तयार होऊ शकते पण वाईनकंपन्यांकडून या वाणासाठी योग्य भाव दिला जात नाही असे शेतकऱ्यांनी म्हटले. त्यामुळे टेबल ग्रेप्स या वाणाचे उत्पादन घेणाऱ्या द्राक्ष उत्पादकांना या निर्णयाचा कसलाच फायदा नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जर या वाणाला वाइन कंपन्यांनी चांगला भाव दिला तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो परंतु या कंपन्या या द्राक्षाला नाकारत आहेत, त्यासोबतच भावसुद्धा कमी देत असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील बर्‍याचशा वाईन कंपन्या या 90% द्राक्षबेंगलोर वरून आयात करतात आणि स्थानिक शेतकऱ्यांचा माल नाकारतात. त्यामुळे स्थानिक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाचा जास्त काही फायदा होणार नाही.त्यामुळे 80% खाण्याचे द्राक्ष पिकवणाऱ्याशेतकऱ्यांचे काय असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. बऱ्याचदा जेव्हा अवकाळी पावसाने द्राक्ष मालखराब होतो तेव्हा हामालशेतकऱ्यांना हामाल पाच ते दहा रुपये किलो प्रमाणे कंपन्यांना द्यावा लागतो.(स्त्रोत-सकाळ)

English Summary: the decision about wine and real situation og grape production in maharashtra Published on: 30 January 2022, 06:43 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters