यावर्षी भारताने स्वतंत्रतेचा अमृत महोत्सव साजरा केला.या अमृत महोत्सवी वर्षात केंद्र शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत.
त्यातीलच एक मोहीम म्हणजे केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून औषधी वनस्पती बद्दल जनजागृती, औषधी वनस्पतींच्या उत्पादन वाढीसाठी मोहीम हाती घेतली आहे. यासंबंधीचे परिपत्रक गुरुवारी मंत्रालयाने प्रसिद्ध करून ही माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत देशभरातील जवळजवळ 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
.आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय वनौषधी मंडळाने यासाठी एक मोहीम हाती घेतली असून या मोहिमेची सुरूवात पुणे आणि सहारनपुर येथून झाली आहे.
या मोहिमे अंतर्गत येणाऱ्या वर्षभरात देशातील 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल व हरित भारताचे स्वप्न ही पूर्ण होईल असे मंत्रालयाचे म्हणणे आहे. या मोहिमेची सुरुवात पुणे आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून झाली असून
या मोहिमेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शेतकरी आणि औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या लोकांना आयुष मंत्रालय औषधी वनस्पतींची रोपे, बिया पुरवीत आहेत. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना बेल, अश्वगंधा, जांभूळ, कडूनिंब आणि पारिजातकाचे रोपेदेण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून देश वनौषधी च्या बाबतीत स्वावलंबी होईल असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला.
Share your comments