1. बातम्या

पश्चिम महाराष्ट्रातील या भागातील शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे संकट, शेतकरी वर्ग चिंतेत

प्रत्येक वेळेस शेतकरी वर्ग हा मृग नक्षत्रात पेरणी ला सुरवात करतो. मृग नक्षत्राच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मूग, ज्वारी, उडीद, सोयाबीन, घेवडा या पिकांची पेरणी करतात.या वर्षी जून च्या सुरवातीला मुसळधार पाऊस पडला परंतु नंतर पावसाने पाठ फिरवली आहे त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत पडला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
farmer

farmer

प्रत्येक वेळेस शेतकरी वर्ग हा मृग नक्षत्रात पेरणी ला सुरवात करतो. मृग नक्षत्राच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मूग, ज्वारी, उडीद, सोयाबीन, घेवडा या पिकांची पेरणी करतात.या वर्षी जून च्या सुरवातीला मुसळधार पाऊस पडला परंतु नंतर पावसाने पाठ फिरवली आहे त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत पडला आहे.

मातीमध्ये घातलेले बियाणे सुद्धा उगवत नाही:

पश्चिम महाराष्ट्रात सतत दुष्काळी तालुके म्हणजे माण, खटाव हे आहेत. या भागात प्रत्येक वर्षी हा कमी प्रमाणात पडत असतो. हे 2 तालुक्यामध्ये सतत दुष्काळ पडत असतो त्यामुळं येथील शेतकरी सतत चिंतेत पडलेला दिसतो. जून च्या सुरवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली परंतु हा काळ जास्त टिकला नाही. त्यामुळं येथील शेतकऱ्यांचा पेरणी चा खर्च सुद्धा निघत नाही. मातीमध्ये घातलेले बियाणे सुद्धा उगवत नसल्याने येथील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.


हेही वाचा:एवढे मोठे नुकसान झाले असूनही शेतकऱ्यांनी दिली कापसाला पसंदी

मृग नक्षत्र मध्ये पेरणी केल्यावर काही दिवसांनी  काही ठिकाणी  बियाणे  उगवली  परंतु  या महिन्यात  येणारा तुरळक  पाऊस हा कायमचाच बंद झाल्यामुळे उगवलेले पीक पाण्याविना आणि पावसाविना जळू लागले आहे. माण आणि खटाव  या  तालुक्यात दुबार पेरणी करावी लागेल या मुळे चिंतीत आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाज सुद्धा या वेळेस चुकीचा   ठरलेला  आहे.  त्यामुळं प्रत्येक शेतकरी वर्गाने पावसाची वाट बघून पेरणी करावी अश्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत.हे दुबार पेरणी चे संकट फक्त पश्चिम महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात शेतकरी वर्गावर दुबार पेरणी चे संकट आले आहे. त्यामुळं शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

सध्या हवामान खात्याने सुद्धा येणाऱ्या काही दिवसात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच काही दिवसांपासून राज्यामध्ये ठीक ठिकाणी ढगाळ वातावरण झाले आहे तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येणाऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांची दुबार पेरणी चे संकट टळेल अशी आशा हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

English Summary: The crisis of double sowing on the farmers in this part of Western Maharashtra, the farmers are worried Published on: 30 June 2021, 02:12 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters