1. बातम्या

कमी मनुष्यबळात सुरू होईल बॉक्स निर्मिती उद्योग

आज भारतामध्ये विविध उद्योग धंद्याची स्थापना होत आहे. कृषी क्षेत्र, औषध निर्माण क्षेत्र, वाहन निर्मिती क्षेत्र, वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचे कारखाने तसेच मिनरल वाटर, बेकरी उद्योग इत्यादी उद्योगधंद्यांमध्ये तयार माल जेव्हा मार्केटमध्ये विक्रीसाठी वितरित केला जातो.

KJ Staff
KJ Staff


आज भारतामध्ये विविध उद्योग धंद्याची स्थापना होत आहे. कृषी क्षेत्र, औषध निर्माण क्षेत्र, वाहन निर्मिती क्षेत्र, वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचे कारखाने तसेच मिनरल वाटर, बेकरी उद्योग इत्यादी उद्योगधंद्यांमध्ये तयार माल जेव्हा मार्केटमध्ये विक्रीसाठी वितरित केला जातो तेव्हा त्या मालाची ब्रँडिंग व मार्केटींगसाठी आकर्षक पॅकिंग ही फार महत्वाची बाब आहे. तयार उत्पादन कितीही चांगले असले तरीही ते चांगल्या पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे आकर्षक पॅकिंग हे यशस्वी उद्योगाचे गमक आहे. माल  पॅकिंगसाठी पुठ्ठ्याच्या बॉक्सची आवश्यकता लागते.  त्यात या तयार मालाची व्यवस्थित पॅकिंग करता येते. म्हणून आजकालच्या काळात बॉक्स निर्मिती उद्योग बेरोजगार युवक व  शेतकऱ्यांसाठी चांगली संधी म्हणून उदयास येत आहे.

 आपण बाजारामध्ये विविध प्रकारचे बॉक्स पाहतो, त्याच्यामध्ये बॉक्सचे दोन प्रकार असतात एक म्हणजे पुठ्ठ्याचा बॉक्स आणि दुसरा म्हणजे लाकडी बॉक्स. पण या दोन्ही प्रकारांमध्ये पुठ्ठ्याच्या बॉक्सला बाजारपेठेत जास्त मागणी असते. अत्यल्प भांडवलात हा बॉक्स निर्मिती उद्योग सुरू करता येतो.  हा उद्योग चांगल्याप्रकारे नावारूपाला येऊ शकतो, कमीत कमी भांडवल वापरून जशी मागणी असेल त्याप्रमाणे पुरवठा करावयाचा असल्याने या धंद्यात नुकसान होईल, अशी भीती दिसून येत नाही. आजकालच्या काळामध्ये अनेक व्यापारी कारखानदार आपला माल पॅकिंग करण्यासाठी साधारणपणे कोरूगेटेड बॉक्स वापरतात. कोरोगेटेड बॉक्स निर्मितीला चांगले दिवस आहेत.

 


कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त माल  साठवण्यासाठी कोरोगेटेड बॉक्सचा वापर केला जातो. हे बॉक्स तयार करताना तयार शीट्स आणून त्यांची बांधणी केली जाते. हव्या त्या आकारात शीट्स तयार केले जातात व क्रिझिंग मशिनच्या साह्याने कट पीस तयार केले जातात व योग्य आकाराच्या ठिकाणी मार्किंग करून बॉक्स फोल्डिंग करून बॉक्सतयार करतात. त्यालाच कोरोगेटेड बॉक्स म्हणतात. चहा पावडर पॅकिंग. स्वीट मार्ट मध्ये मिठाई पॅकिंग करण्यासाठी, इलेक्ट्रिक साधने व काचेचे सामान पॅकिंग करण्यासाठी, औषधांच्या कंपन्यांमध्ये औषधे पॅकिंग करण्यासाठी, बिस्किटे व माचिस इत्यादी माल पॅकिंग करण्यासाठी तसेच फ्रिज, टीव्ही यासारख्या महागड्या वस्तू पॅकिंग करण्यासाठी बॉक्सचा वापर केला जातो. अशाप्रकारे बऱ्याच व्यवसायांमध्ये मालाचे पॅकिंग करण्यासाठी बॉक्सला प्राधान्य दिले जाते, त्यामुळे बॉक्स उद्योगाला चांगले मार्केट आहे.

 बॉक्स तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुठ्ठ्याची गरज भासते व बॉक्स तयार झाल्यानंतर तो आकर्षक बनविण्यासाठी रंगीत कागदाची गरज भासते. कागद बनवणाऱ्या कंपन्यांकडे किंवा ठोक विक्रेत्यांकडे आपणास हव्या त्या जाडीच्या बॉक्स साईज प्रमाणे हाताने कटिंग करूनही तयार करतात. यात थोड्या प्रशिक्षणाची गरज भासते. बॉक्सेस तयार करण्यासाठी स्टिचिंग मशीन, क्रिझिंग मशीन व कटिंग मशीन तसेच शेयरिंग मशीन, कोपरे कटिंग करण्याचे मशीन इत्यादी यंत्राची आवश्‍यकता असते.

 प्रत्येक व्यापाऱ्याला कंपनी, कारखाने, छोटे-मोठे उद्योगधंदे यांना आपल्या उत्पादनाच्या मालाच्या पॅकिंग करिता अत्यावश्यक असणारी गरज बॉक्स पॅकिंग आहे. कुठलाही माल पॅकिंग करण्यासाठी बॉक्स लागतात. स्टेशनरी, बिस्किटे, चप्पल, शूज, टाचण्या इत्यादी कोणत्याही बारीकसारीक वस्तू पॅक करण्यासाठी बॉक्स लागते म्हणून बॉक्स निर्मिती उद्योगात चांगल्या संधी आहेत.

 

या प्रकल्पासाठी लागणारी गुंतवणूक

जर आपल्याला हा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु करायचा असेल तर आपल्याला अंदाजे चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. त्यात प्रामुख्याने लागणारी मशीनमध्ये क्रिझिंग मशीन, स्टिचिंग मशीन इत्यादी प्रमुख यंत्र लागतात. या उद्योगात जास्त मनुष्यबळाची आवश्यकता नसते, जास्तीत जास्त दोन ते तीन लोक याला पुरेसे असतात. हा प्रकल्प चालू करण्यासाठी आपली पत पाहून बँक कर्ज देऊ शकते, तसेच जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्राम विभागाकडून हा प्रकल्प उभा करण्यासाठी शासकीय मदत मिळू शकते. योग्य प्रशिक्षण घेऊन या उद्योगात चांगले यश संपादन करता येते.

English Summary: The box manufacturing industry will start with less manpower Published on: 26 August 2020, 01:26 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters