सध्या ऊसतोड वाहतुकदारांबाबत एक मोठी समस्या समोर आली आहे. यामध्ये कोयत्यांच्या संख्येवर मुकादम मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स घेतो. ही रक्कम तो मजुरांनाही देत नाही, तसेच त्यानंतर ते फरार होतात. यामुळे ऊस मुकादमांकडून सातत्याने होणाऱ्या फसवणुकीमुळे (Farud) अनेक ऊस वाहतूक (Sugarcane Transport) करणारे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
याबाबत वारंवार तक्रारी होत असल्याने पोलिस महानिरीक्षकांनी त्याची दखल घेतली आहे.फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कायदेशीर करावाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे फसवणुकीवर आळा बसून ऊस वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे.
यामुळे सुशिक्षित बेरोजगार असलेल्या वाहतूकदारांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अनेक साखर कारखान्यांची कोट्यावधींची बाकी राहिली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पैसे देखील यामधून बुडवले गेले आहेत.
शेतकऱ्यांना केवळ 1 रूपयात मिळणार पीकविमा, जाणून घ्या...
ऊस वाहतूकदारांना ऊसतोडणी मजूर पुरवठा करताना मुकादमांकडून मोठी आर्थिक फसवणूक होते. दरवर्षी अनेक तक्रारी याबाबत आल्या आहेत. यामुळे अनेकांनी हा धंदाच बंद केला आहे.
दरवर्षी हजारो वाहनधारकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा या मुकादमांकडून घालण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. मुकादम पैसे न देता पसार होतात. त्यामुळे अनेक ट्रॅक्टरधारक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
यावर्षीचा पाऊसकाळ कसा असणार? जाणून घ्या, भारतीय हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती...
हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन पोलिस महासंचालक कार्यालाने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना कारवाई करण्याचे परिपत्रक काढले आहे. यामुळे आता गेलेले पैसे मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
उसाची शेती करताना माती परीक्षणाकडे दुर्लक्ष करू नका...
आता पीक कर्जासाठी 'सिबिल स्कोअर' मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार
शिमला मिरचीने केले मालामाल, पैठणच्या शेतकऱ्याला लाखोंचे उत्पादन..
Share your comments