1. बातम्या

ठाकरे सरकारचं योजना स्थगिती सत्र सुरूच, आणखी एक योजना झाली बंद

मागील सरकारच्या काळातील महत्त्वाच्या योजना ठाकरे सरकारने बंद करण्याचा धडाका लावला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यापासून फडणवीस सरकारच्या काळातील योजना बंद केल्या जात आहेत

KJ Staff
KJ Staff
farmer

farmer

मागील सरकारच्या काळातील महत्त्वाच्या योजना ठाकरे सरकारने बंद करण्याचा धडाका लावला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यापासून फडणवीस सरकारच्या काळातील योजना बंद केल्या जात आहेत. जल शिवार योजना, वृक्ष रोपणांची योजना, आदींसारख्या योजना ठाकरे सरकारने बंद केल्या आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजून एक योजना बंद केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने बळीराजा चेतना अभियान योजना सुरू केली होती.
या योजाना परिणामकारक नसल्याने बंद करण्यात येत आहेत. हेच कारण आतापर्यंत बंद करण्यात आलेल्या योजनांमागे देण्यात आले आहे. फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सन 2015 मध्ये बळीराजा चेतना अभियान योजना तयार करण्यात आली होती. महाराष्ट्रात जवळजवळ 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील उस्मानाबाद आणि विदर्भातील यवतमाळ या दोन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून पाच वर्ष राबवण्यात आली होती. जिल्हास्तरीय, ग्रामस्तरीय आणि बळीराजा चेतना अभियान अशा त्रिस्तरीय समित्या यामध्ये कार्यरत होत्या. मंत्रालयात देखील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली होती.
बळीराजा चेतना अभियान ही योजना काय होती.
बळीराजा चेतना योजनेवर पाच वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यात साठी 48 कोटी आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी 45 कोटी खर्च करण्यात आले. नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचा शोध घेणे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण करणे, सामुदायिक विवाह यांना मदत करणे, आरोग्य उपचारासाठी मदत करणे अशाप्रकारचे लाभ या योजनेत होते. या योजनेदरम्यान गावातील त्रस्त कुटुंबांना ५ हजार रुपये पेरणी, बियाणांसाठी देण्यात येत होते. ही आर्थिक मदत पंचायत समिती द्वारे केली जात असे. सार्वजनिक उत्सव साजरे करणयाकरिता १० हजार रुपयांचे अनुदान ग्रामस्तरीय समितीमार्फत उपलब्ध करुन देण्यात येत असे.

English Summary: Thackeray government's scheme postponement session continues, another scheme is closed Published on: 08 August 2020, 05:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters