1. बातम्या

गोगलगाय शेतकऱ्यांच्यापुढचे टेन्शन

पावसाला सुरवात झाली, की सुप्तावस्थेत जमिनीत लपून बसलेल्या आफ्रिकन राक्षसी शंखी गोगलगायींच्या झुंडीच्या झुंडी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना दिसतात. ही कीड "आफ्रिकन स्नेल' या नावाने परिचित असून तिचे शास्त्रीय नाव "अचेटिना फुलिका" आहे. या किडीचे उगमस्थान पूर्व आफ्रिकेतील मादागास्कर बेट असून नावाप्रमाणे ती जगातील सर्वांत मोठी, महत्त्वाची, आधाशीपणे खाणारी आणि पिकाचे अतोनात नुकसान करणारी शंखी गोगलगाय आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Tension over snail farmers

Tension over snail farmers

पावसाला सुरवात झाली, की सुप्तावस्थेत जमिनीत लपून बसलेल्या आफ्रिकन राक्षसी शंखी गोगलगायींच्या झुंडीच्या झुंडी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना दिसतात. ही कीड "आफ्रिकन स्नेल' या नावाने परिचित असून तिचे शास्त्रीय नाव "अचेटिना फुलिका" आहे. या किडीचे उगमस्थान पूर्व आफ्रिकेतील मादागास्कर बेट असून नावाप्रमाणे ती जगातील सर्वांत मोठी, महत्त्वाची, आधाशीपणे खाणारी आणि पिकाचे अतोनात नुकसान करणारी शंखी गोगलगाय आहे.

एकूण आहाराच्या 75 टक्के त्यांचा आहार म्हणजे पडलेली पिवळी पाने, फुले, फळे, शेणखत, जनावराचे शेण, मेलेले प्राणी, कागदाचे पुठ्ठे आणि कचरा आदी आहे. दिवसा त्या लपून बसतात आणि रात्री आक्रमक होऊन पानांना छिद्रे पाडणे, कळ्या, फळे, फुले, साल, नवीन फुटींचे कोंब, नवीन रोपे, भाजीपाला, फळझाडे, कडधान्य, तेलबिया, तृणवर्गीय पिके आदींचा फडशा पाडतात. बऱ्याच वेळा संपूर्ण पीकच नष्ट होते.

ही कीड वाल, कारली, झेंडू, भोपळा, भुईमूग, टोमॅटो, मका, लसूण, घास, मिरची, भेंडी, फुलकोबी, अन्य भाजीपालावर्गीय पिके व पपई, उंबर, द्राक्ष आदी फळपिकांवर दिसून येते. शंखी गोगलगाय दिवसा कमी प्रकाशाच्या ठिकाणी बांधावर, गवतात, दगड, विटा, लाकूड, खडक, झुडपांच्या बुंध्याशी तसेच परिसरातील मोठ्या झाडांवर 10 ते 15 मीटर उंचीपर्यंत गेलेल्या दिसून आल्या आहेत.

या किडीचा प्रसार शेतातील अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्‍टर -ट्रॉली, इतर वाहने, भाजीपाला, वाहतुकीचे प्लॅस्टिकचे ट्रे, शेणखत, विटा, माती, वाळू, कुड्या, कलम, रोपे, बेणे, ऊस, मॉस, इत्यादी मार्फत होतो. त्यामुळे या किडीचा प्रसार नवीन क्षेत्रात होणार नाही याबद्दल जागरूक राहून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. नदीला पूर आल्यानंतर पाण्याद्वारेही ही कीड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित होते.

गारपिटीत शेतकऱ्याने वाचवली द्राक्ष बाग, उत्पादकाने चालवले डोकं, आणि....

पावसाळ्यातील वातावरण, कमी प्रकाश, जास्त पाऊस, म्हणजेच जास्त आर्द्रता व कमी तापमान ( 20 ते 30 अंश से. ) या किडीला पोषक आहे. सर्व साधारणपणे शंखी गोगलगाय अन्नपाण्याशिवाय सहा महिने जिवंत राहू शकते. वातावरण पोषक नसेल तर ती पावसाळा संपल्यानंतर सुप्तावस्थेत जाते.

उन्हाळ्यात तापमान 30 अंश से. पेक्षा जास्त आणि आर्द्रता 80 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाल्यास शंखाचे तोंड बंद करून या गोगलगायी सुप्तावस्थेत जातात. हिवाळ्यात तापमान 10 अंश से. च्या खाली आणि आर्द्रता 65 टक्‍क्‍यांच्या खाली गेल्यास सुप्तावस्थेत म्हणजे हायबरनेशनमध्ये जातात. आठ महिन्यांच्या या अवस्थेत ओलसर थंड जागेत, मातीत, सावलीत किंवा झुडपाच्या बुंध्याजवळ राहू शकतात. जेव्हा 50 मि .मी. पाऊस पडेल, तेव्हा पायांनी शंखाचे दार उघडून पुन्हा आपले कार्य सुरू करतात. त्यांना वादळ अथवा मोठ्या पावसाची अगोदर सूचना समजते.

अवकाळीमुळे पिकांची मोठी नासाडी, २५ जिल्ह्यांना फटका, एक लाख ३९ हजार हेक्टरवर नुकसान..

या किडीचा जीवनक्रम अंडी, पिल्ले आणि पूर्ण वाढ झालेली गोगलगाय या तीन अवस्थेत पूर्ण होतो. आफ्रिकन शंखी गोगलगाय आपल्या नावाप्रमाणे खूप मोठी आहे. शंखीचे वजन 100 ते 150 ग्रॅम असते. तिचे शंख लांब, निमुळते भुरकट, करड्या रंगाचे असून त्यावर पिवळसर रेषा असतात.

अवकाळी पावसाने नुकसान, पण राज्यांनी अहवाल पाठवले नाहीत: केंद्र सरकारची माहिती
शिर्डीच्या महापशुधन एक्सपो मध्ये पशुपालकांना मिळणार धेनू ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान...
शेतकऱ्याने काढले एकरी १३३ टन ऊस उत्पादन, जाणून घ्या कसे..

English Summary: Tension over snail farmers Published on: 23 March 2023, 12:37 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters