1. बातम्या

शेतकऱ्याने काढले एकरी १३३ टन ऊस उत्पादन, जाणून घ्या कसे..

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Farmer harvested 133 tons of sugarcane per acre

Farmer harvested 133 tons of sugarcane per acre

सध्या अनेक शेतकरी हे शेतात अनेक वेगवेगळे प्रयोग करत आहेत. यामुळे त्यांचे उत्पादन वाढत आहे. सांगली जिल्ह्यात दुष्काळी समजल्या जाणाऱ्या कडेगावची द्राक्ष उत्पादन (Grape production) घेणारा तालुका अशी ओळख निर्माण झाली. परंतु पाणीटंचाईमुळे हे पीक हळूहळू कमी झाले. त्यातच टेंभू योजनेचे पाणी आले. द्राक्षाच्या जागी ऊस आला.

यामुळे शेतकरी उसाकडे वळाले तालुक्यात त्याचे क्षेत्र वाढले. याच तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे खेराडे वांगी. येथील संजय आणि प्रकाश या कदम बंधूंची ३० एकर शेती आहे. वडील शंकरराव यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आणि विटा येथे पोल्ट्री फार्म पाहायचे. संजय यांनी १९९० मध्ये बीकॉमची पदवी घेतली.

शेतीची जबाबदारी संजय यांनी पुन्हा खांद्यावर घेतली. टप्प्याटप्प्याने खडकाळ शेती घेत ती विकसित केली. मुरमाड हलक्या या मातीत गाळ भरून घेतला आणि ती पिकांखाली आणली. शाश्‍वत पाण्याची सोय व्हावी यासाठी नऊ हजार फूट पाइपलाइन करून शेतात आणली. या शेतात ऊस घेण्याचे ठरले.

शेतकऱ्यांनो कांदा काढताना घ्यावयाची काळजी

हे पीक असे आहे की कितीही अभ्यास असला, तरी तो कमीच पडतो अशी संजय यांची धारणा आहे. त्यामुळे या पिकात अभ्यास करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. सन २०१३ च्या दरम्यान या भागातील कृषिभूषण संजीव माने, सुरेश कबाडे, माणिक पाटील, सुरेश माने-पाटील यांच्या संपर्कात ते आले. त्यांच्याकडून या पिकातील बारकावे समजून घेतली.

राज्यात दोन वर्षात येणार 900 ऊसतोडणी यंत्रे, मजुरांना अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही..

ज्ञानवृद्धी होऊ लागली. पिकाचा अभ्यास वाढला. प्रत्येकाकडून मिळालेल्या शिदोरीचा वापर शेतीत सुरू झाला.संजय यांचा ऊसशेतीतील सुमारे नऊ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. दरवर्षी सुमारे १५ एकर त्यांचा ऊस असतो. को ८६०३२ या वाणाचा वापर होतो. आले लागवड असलेल्या शेतात काहीवेळा पूर्वहंगामी उसाचीही लागवड होते. यामध्ये त्यांनी १३३ टनापर्यंत ऊस काढला आहे.

गारपिटीत शेतकऱ्याने वाचवली द्राक्ष बाग, उत्पादकाने चालवले डोकं, आणि....
जगातलं सगळ्यात महागडं फळ! शेतकरी होतील मालामाल...
गाय आणि म्हशी कमी दूध देतात? याकडे लक्ष द्या होईल फायदा..

English Summary: Farmer harvested 133 tons of sugarcane per acre, know how.. Published on: 23 March 2023, 09:44 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters